नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी दररोज 11 ते 2 या वेळेत नगरपालिकेत उपलब्ध सुनंदा अवताडे

नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी दररोज 11 ते 2 या वेळेत नगरपालिकेत उपलब्ध सुनंदा अवताडे
Published on

MGV26B15374
सुनंदा अवताडे


हुकुम मुलाणी ः सकाळ वृत्तसेवा
मंगळवेढा, ता. १७ : शहरातील नागरिकांनी आपल्यावर ठेवलेल्या विश्वासाला पात्र राहून नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी दररोज सकाळी ११ ते दुपारी दोन या वेळेत नगरपालिकेत उपलब्ध असेन असा विश्वास नगराध्यक्षा सुनंदा अवताडे यांनी दिला. नगराध्यक्ष पदाचा पदभार घेत कामकाजाला सुरू केल्यानंतर त्यांनी ‘सकाळ’शी बोलताना आपले पाच वर्षांचे व्हीजन मांडले.

१) नागरिकांच्या अपेक्षापूर्तीसाठी तुमचे काय नियोजन आहे?
नुकत्याच झालेल्या निवडणुकीत नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्याचा विश्वास नागरिकांना दिल्यानंतर नागरिकांनी मोठ्या अपेक्षेने माझ्या हातात नगरपालिकेची चावी दिली त्यांच्या अपेक्षापूर्ती करण्यासाठी माझे प्रयत्न राहतील. प्रचारा दरम्यान मी नागरिकांना शहराचा कारभार आईच्या भूमिकेतून पार पडणार असल्याचा विश्वास दिला तो विश्वास या पुढील काळात देखील कायम ठेवला जाणार आहे. शहर विकासाचे व्हीजन सांगताना शहरातील नागरिकांना स्वच्छता, आरोग्य,दिवाबत्ती आणि पाणी हे पहिले व्हीजन आहे. स्वच्छ केलेला परिसर पुन्हा तसाच होऊ नये यासाठी त्या लोकांचे प्रबोधन देखील करणार आहे.
-----
२) भूमीगत गटारांबाबत काय कराल?
शहरातील उघड्या गटारीचा त्रास नागरिकांना मोठ्या प्रमाणात सोसावा लागला. यातून शहरातील व शहरात आलेल्या बाहेर गावच्या नागरिकांना या त्रासातून सुटका व्हावी या दृष्टिकोनातून भूमिगत गटारीचा प्रश्न मार्गी लावावा लागणार आहे. शहरातील नागरिकांना भेडसावणारा दुर्गंधीचा त्रास कमी होईल त्या दृष्टीने प्रयत्न करणार आहे
----
३) विविध स्मारके कधी पूर्ण करणार?
शहरासमोर सध्या मोठी आव्हाने आहेत शहराचे सौंदर्य वाढवणारे महात्मा बसवेश्वर व संत चोखोबा स्मारकाचा प्रश्न अनेक महिने प्रलंबित आहे तो तो प्रश्न सोडवण्यासाठी पाठपुरावा करणार आहे. नगरपालिकेशेजारील जागेत संतसृष्टी करण्याची शहरवासीयांच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. याशिवाय बाहेरगावहून शहरात आलेल्या नागरिकांना संतांची ठिकाणी दाखवण्यासाठी आवश्यक असणारे दिशादर्शक ठळक दिसतील अशा पद्धतीने लावणार आहे.
-------
४) सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही लावण्याचे नियोजन करणार आहात का?
ग्रामीण भागातून आठवडा बाजारात आलेल्या महिलांसाठी स्वच्छतागृह सुरू करणार आहे. सध्या बंद असलेल्या ठिकाणी नवीन स्वच्छतागृह सुरू करण्यावर लक्ष दिले जाईल. याशिवाय आणखीन आवश्यक त्या ठिकाणी सुलभ शौचालयाची उभारणी करण्यात येणार आहे. सध्या शहरामध्ये असलेल्या सीसीटीव्हीची संख्या आणखीन वाढवून सर्व परिसर तिसऱ्या डोळ्याच्या नजरेत आणून ठेवणार आहे जेणेकरून शहराच्या हद्दीत चोरीसारख्या घटनेला अटकाव करण्याचा प्रयत्न राहील.
----
५) हद्दवाढ भागाच्या विकासाचे काय?
शहराच्यालगत दोन ग्रामपंचायती व प्रास्तावित ग्रामपंचायतींमधील नागरिकांना आणखी चांगल्या सुविधा देण्यासाठी हद्दवाढीचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे. त्याच्या मंजुरीसाठी पाठपुरावा करण्यासाठी आमचे प्रयत्न राहतील. शहरातील विकास कामाची अंमलबजावणी प्रभावीपणे राबविण्यासाठी शहराला सध्या पूर्णवेळ मुख्याधिकाऱ्यांची आवश्यकता आहे त्यामुळे येत्या काही दिवसात पूर्ण वेळ मुख्याधिकारी मिळावी यासाठी शासनाकडे पत्र व्यवहार देखील करण्यात येणार आहे
---
६) शहराची ऐतिहासिक ओळख कायम राहावी यासाठी काय नियोजन आहे?
उन्हाळ्याची चाहूल लक्षात घेता शहरातील नागरिकांना दैनंदिन व सुरळीत पाणीपुरवठा करण्यावर आपला भर राहील या सुविधा जर नागरिकांना वेळेत दिल्या तर नागरिकाकडून कराचा भरणा देखील वेळेवर भरला जातो. शहराची ऐतिहासिक शहराची ओळख कायम
राहावी यासाठी शिवप्रेमी चौकात कायमस्वरूपी कमान उभा करण्यासाठी आमचे प्राधान्य राहील. याशिवाय शहरातील प्रमुख ठिकाणी देखील कमान उभा करून शहराचे सौंदर्य आणखीन कसे वाढेल यासाठी लक्ष देणार आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com