मंगळवेढ्यात महास्वच्छता अभियान उत्साहात संपन्न

मंगळवेढ्यात महास्वच्छता अभियान उत्साहात संपन्न

Published on

MGV26B15483
मंगळवेढा ः महास्वच्छता अभियानात सहभागी नगराध्यक्षा सुनंदा अवताडे व इतर मान्यवर.

मंगळवेढ्यात धर्माधिकारी प्रतिष्ठानकडून स्वच्छता अभियान
मंगळवेढा, ता. ५ ः महाराष्ट्रभूषण नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त व पद्मश्री अप्पासाहेब धर्माधिकारी व रायगडभूषण सचिन धर्माधिकारी यांच्या प्रेरणेने शहरात राबविण्यात आलेल्या महास्वच्छता अभियानाच्या उपक्रमात मंगळवेढ्यात चांगला प्रतिसाद मिळाला.
महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या सामाजिक कार्य व स्वच्छतेच्या-विचारांच्या प्रेरणेने तसेच रायगड भूषण डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी व सचिनदादा यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
समाज प्रबोधनाबरोबरच स्वच्छता अभियान, पर्यावरण संवर्धन व सामाजिक बांधिलकी यांचा संदेश देणाऱ्या धर्माधिकारी परिवाराच्या कार्यातून प्रेरणा घेत देशभरात विविध सामाजिक उपक्रम राबविले.
स्वच्छता अभियानासाठी वारी परिवार, नगरपरिषदेचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले. शहरातील प्रमुख रस्ते, शासकीय कार्यालये, सार्वजनिक ठिकाणे व परिसरात स्वयंसेवकांनी प्रत्यक्ष अभियान स्वच्छता करून नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती केली. या उपक्रमात अंदाजे २३० स्वयंसेवक व सदस्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
यामध्ये नगराध्यक्षा सुनंदा आवताडे, उपकृषी अधिकारी प्रशांत काटे, पोलिस उपनिरीक्षक डॉ. आरती कन्हेरे, वारी परिवाराचे सिद्धप्पा शिंदे तसेच माजी सैनिक संघटना तालुकाध्यक्ष मल्लय्या स्वामी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
स्वच्छता अभियान या अभियानादरम्यान सुका कचरा १७,५०० किलो व ओला कचरा ८०० किलो असा एकूण १८,३०० किलो कचरा संकलन करण्यात आले. महास्वच्छता अभियानामुळे अनेक भाग स्वच्छ झाले असून, पर्यावरण संरक्षणाचा प्रभावी संदेश समाजात पोचला.

Marathi News Esakal
www.esakal.com