सकाळ इफेक्ट घरकूल व मनरेगा बाबत आ.आवताडे नी तारांकित प्रश

सकाळ इफेक्ट घरकूल व मनरेगा बाबत आ.आवताडे नी तारांकित प्रश

Published on

MGV26B15447
सकाळ इम्पॅक्ट लोगो वापरावा

घरकूल, मनरेगा बाबत आ. आवताडेंची लक्षवेधी

अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंगळवेढ्याचे दोन गंभीर प्रश्न सुटण्याची आशा

मंगळवेढा, ता. २२ : तालुक्यात विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे विलिनीकरण महाराष्ट्र ग्रामीण बँकेत झाले असून या विलिनीकरणाचा फटका तालुक्याच्या दक्षिण भागातील घरकुल व मनरेगा लाभार्थ्याला बसला आहे. पोर्टलवर बँकेचे नाव नसल्यामुळे घरकुल लाभार्थ्यांचे अनुदान शासन स्तरावर रखडले. हे वृत्त ‘सकाळ’ने प्रकाशित केले होते. आ. समाधान अवताडे हा प्रश्न विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकितसाठी दिला.
जिल्ह्यात महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या ५० हून अधिक शाखा असून आ. आवताडे यांनी या संदर्भात २४७२६ क्रमांकानुसार लक्षवेधी लावल्यामुळे याचे उत्तर देण्यासाठी प्रशासनाची पुरती धावपळ सुरू झाली आहे. जिल्ह्यात या बँकेत खाते असणाऱ्या लाभार्थ्यांची होणारी पळापळ या लक्षवेधीने थांबणार आहे.
सध्या रमाई आवास योजना, मोदी आवास योजना, पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर योजना या राज्य सरकार थेट बँक खात्यावर जमा करत असल्यामुळे तालुक्याच्या दक्षिण भागातील जवळपास जालीहाळ, भाळवणी, रड्डे, निंबोणी, पौट, जित्ती, चिक्कलगी, जंगलगी, सलगर खुर्द, सलगर बु, शिवनगी, सोड्डी, आसबेवाडी, बावची या गावातील ३०० हून अधिक रमाई व मोदी आवास घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांच्या हप्त्याचे वितरण रखडले आहे. यापूर्वी या बँकेचा खाते क्रमांक १५ अंकी होता. विलेनीकरणानंतर खाते क्रमांक ११ अंकी आणि आयएफसी कोड हे दोन्ही बदलले आहेत. त्यामुळे सध्या घरकुलच्या व मनरेगाच्या पोर्टलवर ही बँक दाखवतन नाही. त्यांना दुरुस्त करून हा नवीन खाते नंबर व आयएफसी कोड देखील अपलोड करता येत नाही. त्यामुळे लाभार्थी आर्थिक अडचणीत सापडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com