विद्यार्थ्याना सर्वांगीण ज्ञान देणारी इंग्लिश स्कूल प्रशाला : मनीषा मिसाळ  इंग्लिश स्कूल मध्ये भरला बालचमूंचा आनंदी बाजार

विद्यार्थ्याना सर्वांगीण ज्ञान देणारी इंग्लिश स्कूल प्रशाला : मनीषा मिसाळ इंग्लिश स्कूल मध्ये भरला बालचमूंचा आनंदी बाजार

Published on

MGV25B14983
मंगळवेढा : इंग्लिश स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनात आयोजित करण्यात आलेल्या आनंदी बाजार उपक्रमात भाजीपाल्याची खरेदी करताना पालक.


विद्यार्थ्यांना सर्वांगीण ज्ञान देणारी प्रशाला
मनीषा मिसाळ; इंग्लिश स्कूलमध्ये भरला बालचमूंचा आनंदी बाजार उत्साहात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवेढा, ता. २७ : मुलांनी व्यावहारिक जगात जगावे कसे? हे आनंदी बाजार उपक्रमातून शिकता येते, असे प्रतिपादन तालुका कृषी अधिकारी मनीषा मिसाळ यांनी केले. इंग्लिश स्कूल मंगळवेढा अमृत महोत्सव वर्षानिमित्त वार्षिक स्नेहसंमेलनात विविध कला गुण दर्शनाच्या निमित्ताने आनंदी बाजार या कार्यक्रमाचे उद्‍घाटन त्यांच्या हस्ते झाले.
यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष अॅड. सुजित कदम, उपाध्यक्ष सुभाष कदम, सचिव प्रियदर्शिनी कदम, सहसचिव श्रीधर भोसले, तेजस्विनी कदम, अजिता भोसले, शिवाजी पाटील, यतीराज वाकळे, रामचंद्र नेहरवे, नगरसेवक अनिल बोदाडे, प्रशांत यादव उपस्थित होते. यावेळी इंग्लिश स्कूल माध्यमिक उच्च माध्यमिक महाविद्यालय फार्मसी कॉलेज शिवतेज प्राथमिक शाळा या शाळेतील विद्यार्थ्यांनी आनंदी बाजारामध्ये फळे भाजीपाला स्टेशनरी साहित्य दैनंदीनवस्तू खाद्य पदार्थ विक्रीसाठी आणले होते. शहरातील अनेक नागरिकांनी या आनंदी बाजाराचा अनुभव घेतला. या बाजारासाठी प्रा. महेश उकरंडे, प्रमोद ताड, सौरभ गायकवाड यांनी विशेष प्रयत्न केले. यावेळी प्राचार्य राजेंद्र गायकवाड, फार्मसी प्राचार्य डॉ आर.आय.जाधव, मुख्याध्यापक रवींद्र काशीद, उपमुख्याध्यापक सुनील नागणे, ज्योती जमदाडे, सुहास माने, कार्याध्यक्ष विजय दुधाळ, दयानंद धसाडे, अनिल तुपकरसह विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते. प्रास्ताविक पर्यवेक्षिका लता ओमने यांनी केले. अविनाश शिंदे यांनी सूत्रसंचालन तर आभार आशपाक काझी यांनी मानले.
---------------------
चौकट
भाजीपाल्‍याचे ७० स्टॉल उभे
आनंदी बाजारामध्ये यावर्षी ७० स्टॉल वर विविध प्रकारचा भाजीपाला विक्रीस आणला होता तर २८ स्टॉलवर विद्यार्थ्यांनी फळे चिंचा कणीस विक्री केली याशिवाय खवय्यासाठी ४४ स्टॉल उभारण्यात आले होते यात यामध्ये विविध प्रकारच्या वस्तू उत्पादनांची विक्री करण्यात आली.
-

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com