मंगळवेढ्यात नदीपात्र कोरडे ठणठणीत पाण्यासाठी नागरिक व शेतकर्‍यांचा आक्रोश

मंगळवेढ्यात नदीपात्र कोरडे ठणठणीत पाण्यासाठी नागरिक व शेतकर्‍यांचा आक्रोश

Published on

MGV26B15253
माचणूर (ता. मंगळवेढा) : पाण्याअभावी कोरडे पडलेले भीमानदी पात्र.
......
मंगळवेढा परिसरातील नदीपात्र कोरडे
......
शेतकरी चिंताग्रस्त; उजनीतून पाणी न सोडल्याने पिकांना बसणार फटका
.....
मंगळवेढा, (ता. ४) : उजनी धरणातून जानेवारी महिन्यात भीमा नदीत सोडण्यात येणारे पाणी अद्याप न सोडल्यामुळे मंगळवेढा परिसरातील नदीपात्र सध्या पूर्णपणे कोरडे ठाक पडले आहे. याचा तालुक्यातील बागायत पिकांसह आगामी उन्हाळी पिकांना फटका बसणार आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत.
तालुक्यात भीमा नदीकाठ हा सधन पट्टा मांडला जातो. मंगळवेढा शहर, उचेठाण, बठाण, ब्रम्हपुरी, माचणूर, मुंढेवाडी, तामदर्डी, रहाटेवाडी, नंदूर, अरळी, सिद्धापूर, बोराळे आदी गावांसह भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना व लगतच्या गावाच्या शेतीसाठीच्या पाणीपुरवठा संस्थाना पाणीपुरवठा होत आहे. उजनी यंदा सततच्या पावसामुळे शंभर टक्केच्या पुढे भरले होते. अतिरिक्त झालेले पाणी नदीत सोडल्यामुळे काठावरील बागायत क्षेत्र पाण्याखाली जाऊन नुकसान झाले. मात्र सध्या भीमा नदीचे पात्र कोरडे ठणठणीत पडल्यामुळे शेतीपिकांसह जनावरांची तहान कशी व कुठे भागवायची असा प्रश्न पशू पालकांना पडला आहे. पात्रातील खड्ड्यांमधील साचलेल्य क्षारयुक्त पाण्यामुळे नागरिकांना गंभीर आजार होत असल्याचे सांगण्यात येत आहे.

चौकट
यात्रेसाठी पाण्याची प्रतिक्षा
१५ फेब्रुवारीला माचणूर येथील सिद्धेश्वर यात्रा भरत असल्याने या भाविकांना पाणी मिळणार का? असा प्रश्न भाविक विचारत आहेत. त्यामुळे आता पाण्यासाठी परिसरातील नागरिकांना प्रतिक्षा लागली आहे.

कोट
नदीकाठी शेती क्षेत्र टिकवण्यासाठी तसेच उन्हाळ्यातील पाणीटंचाई थांबवण्यासाठी सध्या नदीपात्रात पाणी सोडण्याची आवश्यकता आहे त्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे मागणी करणार आहे.
- भारत बेदरे, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी
------
कोट
जानेवारीचे पहिले आवर्तन न सोडल्याने नदीकाठची पिके जळून जात आहेत. शंभर टक्के भरलेले धरण नियोजना अभावी शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरत नाही. राजकीय पुढाऱ्यांसह पालकमंत्री निवडणुकीत व्यस्त आहेत. नदीकाठावरील शेती धोक्यात आली असून या भागाचे वाळवंट करायचे आहे का? असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित होत आहे.
- दत्तात्रय बेदरे, शेतकरी, बठाण
------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com