फेरीविक्रेत्यांनी नागरिकांना व वाहनधारकांना त्रास होईल अशा पद्धतीने मालाची विक्री करू नये नगराध्यक्षांच्या सूचना

फेरीविक्रेत्यांनी नागरिकांना व वाहनधारकांना त्रास होईल अशा पद्धतीने मालाची विक्री करू नये नगराध्यक्षांच्या सूचना

Published on

MGV26B15441
मंगळवेढा ः श्री संत दामाजी चौकात दामाजी पुतळ्याभोवती हार विक्रेते व फळ विक्रेत्यांना सूचना देताना नगराध्यक्षा सुनंदा आवताडे.

मंगळवेढ्यात नगराध्यक्षा सुनंदा आवताडे रस्त्यावर

वाहतुकीला होणाऱ्या अडथळ्यांचा घेतला आढावा; फळ, फूल विक्रेत्यांना सूचना

मंगळवेढा, ता. २४ ः शहरातील फेरीवाले, विक्रेत्यांनी वाहतुकीला अडथळा ठरू नयेत अशा पद्धतीने मालाची विक्री करावी, अशा सूचना नगराध्यक्षा सुनंदा अवताडे यांनी दिल्या. सोमवारी बाजारदिवशी थेट रस्त्यावर उतरून चौकात फिरून त्यांनी वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या अनेक बाबींचा आढावा घेतला.
दामाजी चौकात विक्रेते रस्त्यावर बसतात. शाळा असल्याने विद्यार्थी व वाहनधारकांचीही या चौकात सातत्याने गर्दी होते. वाहतूक कोंडी होते. नगराध्यक्षा आवताडे यांनी रस्त्यावर उतरत फेरीवाल्यांना सूचना दिल्या. मालाची विक्री आखून दिलेल्या जागेत करावी व याचा त्रास वाहनधारक सर्वसामान्य नागरिकांना होता कामा नये याची काळजी घेण्यास त्यांनी विक्रेत्यांना सांगितले. श्री संत दामाजी पंतांच्या पुतळ्याभोवती फळविक्रेते, फूल विक्रेते आदी बसतात. पुतळा या व्यवसायिकांच्या गराड्यात अडकला आहे. यावेळी पालिकेच्या करनिरीक्षक महानंदा धुमाळ, लिपीक बाबासो पवार, नागन्नाथ राजमाने व अन्य कर्मचारी उपस्थित होते.
चौकट
‘पुतळा परिसर रिकामा करा’
श्री संत दामाजी पंतांच्या पुतळ्या जवळ फुलविक्रेते, फळविक्रेते यांना येथील जागा रिकामी करा, यापुढे येथे बसायचे नाही अशा सक्त सूचना दिल्या. काही फळविक्रेते रस्त्यावर धोकादायक अवस्थेत बसत असल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. यापुढे व्यावसायिक येथे बसल्यास दंड आकारण्याचा इशाराही त्यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com