सेपक टकरा स्‍पोर्ट्स् बातमी

सेपक टकरा स्‍पोर्ट्स् बातमी
Published on

मंगळवेढ्यात गुरुवारी जिल्हास्तरीय ‘सेपक टकरा’ स्पर्धा
सोलापूर : शहर व जिल्हा सेपक टकरा असोसिएशनच्या वतीने तसेच महाराष्ट्र राज्य सेपक टकरा संघटनेच्या मान्यतेने मंगळवेढा येथे जिल्हास्तरीय अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा २१ मे रोजी इंग्लिश स्कूल, मंगळवेढा येथील क्रीडा संकुल हॉलमध्ये सकाळी १० वाजता सुरू होणार आहे. या स्पर्धेतून ४ ते ७ जून २०२६ दरम्यान नागपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय सेपक टकरा स्पर्धेसाठी सोलापूर जिल्ह्याचा अधिकृत संघ निवडला जाणार आहे. स्पर्धेत जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी व्हावे, असे आवाहन असोसिएशनचे अध्यक्ष संजय सावंत व उपाध्यक्ष अंबादास पांढरे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी रामचंद्र दत्तू (९४२०७८०६३३) किंवा आण्णा वाकडे (७०२८८३५४८२) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com