माझा प्रभाग प्रीती सूर्यवंशी मंगळवेढा नगरपालिका प्रभाग पाच
लोगो : मंगळवेढा नगरपरिषद
---
MGV26B15473
---
शहराचा ऐतिहासिक वारसा जतन करणार
मंगळवेढा : प्रभाग क्रमांक ५ मध्ये असलेल्या तमाम महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याशेजारी अर्धवट राहिलेले सुशोभीकरण पूर्ण करण्यास प्राधान्य देणार. शहराचा ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी सर्व मंगळवेढेकर प्रयत्नशील आहेत. त्या प्रयत्नांना हातभार लावणे ही प्रभागातील नगरसेविका म्हणून माझी जबाबदारी आहे. याच प्रभागात नगरपालिका शाळा क्रमांक १ व २ साठी नवीन इमारती उभारणे, खराब झालेले रस्ते व गटारी बांधणे, स्वच्छता, आरोग्य व पाणीपुरवठा या मूलभूत सुविधांना प्राधान्य देणार आहे. महिला सक्षमीकरणासाठी बचत गट सुरू करून विविध योजनांमधून निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल. प्रभागातील बेघर नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घरे मिळवून देणे, मोकळ्या जागेत वृक्षलागवड करून पर्यावरण संतुलन राखणे, तसेच लहान मुलांसाठी असलेल्या गणेश बागेचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. ऐतिहासिक हेमाडपंती महादेव मंदिर व महादेव विहिरीचे पुनरुज्जीवन करण्यावरही भर दिला जाणार आहे. नगराध्यक्ष सुनंदा आवताडे, उपनगराध्यक्ष प्रा. येताळा भगत आणि सर्व नगरसेवकांच्या सहकार्याने प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार आहे.
- प्रीती सूर्यवंशी, नगरसेविका, मंगळवेढा नगरपरिषद
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

