साठवण तलाव भरत नसल्याने ते त्वरित भरण्यासाठी मुख्य कॅनालवरुन थेट बंदीस्त नलिकेद्वारे भरून देण्याच्या कामाचे सुधारीत संकल्पन तयार करण्याच्या सूचना

साठवण तलाव भरत नसल्याने ते त्वरित भरण्यासाठी मुख्य कॅनालवरुन थेट बंदीस्त नलिकेद्वारे भरून देण्याच्या कामाचे सुधारीत संकल्पन तयार करण्याच्या सूचना

Published on

मुख्य कॅनॉलवरून नलिकेद्वारे
साठवण तलावात पाणी सोडा

विखे पाटील यांच्या सूचना; मंगळवेढ्याला होणार फायदा

मंगळवेढा, ता. ५ ः म्हैसाळ उपसा सिंचन प्रकल्पांतर्गत तालुक्यातील लाभक्षेत्रात असलेले शिरनांदगी, पडोळकरवाडी, मारोळी व लवंगी हे साठवण तलाव उप वितरिका व लहान पाईपद्वारे भरून देत आहेत. त्यामुळे तलाव भरत नसल्याने ते त्वरित भरण्यासाठी मुख्य कॅनालवरून थेट बंदिस्त नलिकेद्वारे भरून देण्याच्या कामाचे सुधारीत नियोजन तयार करण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या.
म्हैसाळच्या लाभक्षेत्रातील अडचणी सोडवण्यासाठी व नवीन तीन गावांना पाणी देण्याच्या अनुषंगाने जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दालनात बैठक आयोजित केली. या बैठकीस आ. समाधान आवताडे, लाभ क्षेत्राचे सचिव डॉ. संजय बेलसरे, कार्यकारी संचालक डॉ. एच. टी. धुमाळ, मुख्य अभियंता संजीव चोपडे, जि. प. सदस्य प्रदीप खांडेकर, स्वीय सहाय्यक रावसाहेब फटे आदी उपस्थित होते. १९ गावांना म्हैसाळचे पाणी अपुऱ्या व कमी दाबाने मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना याचा उपयोग होत नाही. शेतकऱ्यांमध्ये वाद विवाद होत असल्याने वितरिका क्रं १, वितरिका क्रं २, उमदी डी. वाय. वरून ८ गावांना पाणी दिले जाते. त्याऐवजी मुख्य कालव्यावरून मंगळवेढा तालुक्यासाठी स्वतंत्र बंदिस्त पाईप टाकून द्यावे. तसेच शिरशी मानेवाडी भोसे या गावाचा म्हैसाळ योजनेत समावेश करावा. पडोळकरवाडी, शिरनांदगी, मारोळी,लवंगी या साठवण तलावात बंदिस्त पाईपलाईन द्वारे पाणी सोडावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हैसाळ उपसा सिंचन प्रकल्पांतर्गत उमदी वितरिकेद्वारे सिंचन होत असलेल्या ८ गावांसाठी जत शाखा मुख्य कालवा येथून थेट स्वतंत्र बंदिस्त पाईप टाकून देणे तसेच जत येथील मुख्य मुख्य कालव्यातून स्वतंत्र बंदिस्त पाईप टाकणे, शिरसी, मानेवाडी, भोसे गावातील दक्षिण-पश्चिम बाजूच्या भागाला स्वतंत्र पाईपद्वारे पाणी देण्याबाबत तत्काळ सर्वेक्षण करून प्रस्ताव द्यावा, अशा सूचना दिल्या.
------
माझ्या जिल्हा परिषद गटात असलेल्या या भागातील शेती क्षेत्राचा जास्तीत जास्त म्हैसाळच्या लाभक्षेत्रामध्ये समावेश करावा. तो भाग सिंचन क्षेत्रात आणण्यासाठी आ समाधान आवताडे यांच्या नेतृत्वाखाली माझे प्रयत्न राहतील.
प्रदीप खांडेकर जिल्हा परिषद सदस्य, भोसे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com