मंगळवेढ्यात 18 बाजार कट्ट्यावर केलेल्या दिवाबत्ती सोयीमुळे उशिरापर्यंत

मंगळवेढ्यात 18 बाजार कट्ट्यावर केलेल्या दिवाबत्ती सोयीमुळे उशिरापर्यंत

Published on

MGV26B15239
मंगळवेढा : शहरातील मुख्य बाजारपेठेत दिवे बसविण्यात आल्याने रात्री उशिरापर्यंत भाजीपाल्याची खरेदी-विक्री होत आहे.

मंगळवेढ्यातील बाजार कट्ट्यावर बसविले १७० दिवे
..........
विक्रेते अन् ग्राहकांची झाली सोय; १६ व्यापारी कट्टेही उपलब्ध
............
सकाळ वृत्तसेवा
मंगळवेढा, ता. १ : शहरातील मुख्य बाजारपेठेत दर सोमवारी भरणाऱ्या बाजार तळातील व्यापारी शेडमध्ये १७० दिवे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे आता बाजारकरूंना रात्री उशिरापर्यंत फळभाज्या व वस्तू विक्री करण्याची आणि खरेदीदारांना खरेदी करण्याची सोय होणार आहे. याशिवाय नगरपालिकेने १६ मोठे व्यापारी कट्टेही उपलब्ध करून दिले आहेत.
मंगळवेढा शहरांमध्ये दर सोमवारी आठवडा बाजार भरतो या बाजारासाठी शहरालगतच्या विक्रेत्याबरोबर चडचण, उमदी, सांगोला, पंढरपूर, मोहोळ, जत या भागातील भाजीपाला विक्रेते, फळविक्रेते व पान विक्रेते, त्याचबरोबर अन्य साहित्य विक्रीसाठी आलेले असतात. त्यातील बहुतांश विक्रेत्यांना जागेचा प्रश्न असल्यामुळे काही विक्रेते रस्त्यावरदेखील बसलेले असतात, खरेदीसाठी शहरातील नागरिकांबरोबर खोमनाळ भाळवणी भालेवाडी, मुंडेवाडी, धर्मगाव, ढवळस, मारापुर, अकोला, पाटकळ, डोंगरगाव, कचरेवाडी, शरदनगर, मल्लेवाडी, फटेवाडी, गावातील नागरिक भाजीपाला खरेदीसाठी आलेले असतात मात्र रात्री उशिरापर्यंत दिवाबत्तीची सोय नसल्यामुळे काही विक्रेत्यांचा भाजीपाला न विकल्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान होत होते, शिवाय त्यामुळे तो बाजारात असाल टाकून दिला जायचा त्यामुळे नगरपालिका स्वच्छता कर्मचाऱ्याला दुसऱ्या दिवशी स्वच्छतेसाठी कष्ट घ्यावे लागत होते. सध्या नगरपालिकेच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून १२.५० लाखांचा निधी खर्चून आठवडा बाजार परिसर चांगल्या पद्धतीने सुशोभित होत आहे. भव्य नाट्यगृह, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा परिसर, व आठवडा बाजारात नवीन कट्टे, संपूर्ण मैदान कॉंक्रिटीकरण, अंडरग्राउंड गटार विद्युत रोषणाईचे काम झाले. शिवाय हातावर पोट असलेल्या नागरिकांची दिवसभरात मोलमजुरी करून उशिरा बाजारपेठेत खरेदीसाठी येऊन सुद्धा मालाची खरेदी करता येऊ लागली आहे.
----
कोट
नगरपालिकेचा नुकताच पदभार घेतला. निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाप्रमाणे शहरात आलेल्या व्यापाऱ्यांना व खरेदी करणाऱ्या नागरिकांनादेखील या परिसरात स्वच्छतागृह, शुद्ध पाणी देण्यासाठी नगरपालिकेकडून प्रयत्न केले जातील.
- सुनंदा अवताडे, नगराध्यक्ष, मंगळवेढा
------
कोट
शहरात चांगल्या बाजार व्यवस्थेमुळे नागरिकांची बाजारासाठी गर्दी असते नगरपालिका प्रशासनाने रस्त्यावर बसणारे विक्रेते शेडमध्ये बसविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. पार्किंगसाठी स्वतंत्र व्यवस्था करावी. जेणेकरून आणखीन आर्थिक उलाढाल होण्यास मदत होईल.
- सागर जाधव, नागरिक, मंगळवेढा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com