

मंगळवेढा नगरपरिषद असा लोगो वापरा
पाणीपुरवठा समितच्या बैठकीत विविध कामांना मंजुरी
मंगळवेढा, ता. २२ ः मंगळवेढा नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा समतीची बैठक सभापती तरन्नुम आझाद दारूवाले यांच्या उपस्थितीत पार पडली. त्यामध्ये विविध विकासकामांना मंजुरी देण्यात आली.
या सभेमध्ये हजारे गल्ली येथील पाइपलाइन करणे, पाणी पुरवठा विभागाकडील दप्तर ठेवण्यासाठी नवीन कपाट खरेदी करणे, जलशुध्दीकरण केंद्राच्या इमारतीच्या खिडक्यांची दुरुस्ती करणे, संभाजीनगर येथील पाण्याच्या टाकीचे मेन १० इंची वॉल दुरुस्तीच्या खर्चास कार्यरत मंजुरी, भीमनगर येथील मोटार दुरुस्त करणे, बोराळे नाका येथील मुस्लीम कब्रस्तानमधील विंधन विहीर दुरूस्ती व साहित्य बसविणे आदि विषयावर चर्चा होऊन सर्व कामांना मंजुरी देण्यात आलेली आहे.
या बैठकीस पाणीपुरवठा समितीच्या सभापती तरन्नुम दारूवाले, सदस्य सोमनाथ हुशारे, प्रशांत गायकवाड, नागर गोवे, सावित्रीबाई कोंडुभैरी तसेच पाणीपुरवठाचे अधिकारी रामभाऊ पवार, ज्ञानेश्वर टाकणे, संतोष माळी, नंदू गडेकर, तानाजी इंगळे आदि उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.