कर्नाटकातील आंब्याची लवकर हजेरी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 जानेवारी 2019

पुणे : गुलटेकडी मार्केट यार्ड येथील फळबाजारात कर्नाटक येथून बदाम, सुंदरी, लालबाग आणि हापूस आंब्यांची आवक सुरू झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दोन आठवडे लवकरच कर्नाटकातील आंब्यांची आवक झाली असून, हिरव्या आणि लालसर अशा या आंब्याला भावही चांगला मिळाला. 

दर वर्षी कर्नाटकातून जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात या आंब्यांची तुरळक आवक सुरू होते. यंदा प्रथमच जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ही आवक झाली आहे. कर्नाटकातील हुबळी, धारवाड, तसेच आंध्र प्रदेशच्या सीमेलगतच्या गावांतून ही आवक झाली आहे.

याविषयी आडते रोहन उरसळ म्हणाले, की ही हंगामपूर्व आवक आहे. साधारणपणे जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यापासून मार्च महिन्यापर्यंत या आंब्यांची आवक हळूहळू वाढेल. एप्रिलपासून मोठ्या संख्येने हे आंबे बाजारात येतात. गेल्या दोन दिवसांत बदाम आंब्याची 350 ते 400 किलो, सुंदरी आंब्याची 150 किलो, लालबाग आंब्याची 100 किलो, तर हापूस आंब्याची सुमारे 20 डझन आवक झाली आहे. बदाम आंब्याचा प्रतिकिलो दर 70 ते 80 रुपये, सुंदरी आंब्याचा 50 रुपये, लालबाग आंब्याचा 60 ते 80 रुपये आणि हापूस आंब्याचा डझनाचा दर 700 ते 800 रुपये असा राहिला.'' 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mangoes of Karnataka will coming soon