खुपसंगी येथे चोरट्याने घरात प्रवेश करुन 62 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल नेला चोरुन

खुपसंगी येथे चोरट्याने घरात प्रवेश करुन 62 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल नेला चोरुन

Published on

६२ हजारांचा ऐवज
खुपसंगीतून लंपास

मंगळवेढा : खुपसंगी (ता. मंगळवेढा) येथे पहाटे पाच वाजता घराचा दरवाजा पुढे करून कुटुंबीय झोपले असता चोरट्याने घरात प्रवेश करून लोखंडी कपाटात ठेवलेले चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ६२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याप्रकरणी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. यातील फिर्यादी नेमा चौगुले (रा. खुपसंगी) हे २८ च्या पहाटे ५.१५ वाजता घराचा दरवाजा पुढे करून झोपले होते. चोरट्याने घरात प्रवेश करून लोखंडी कपाटात ठेवलेले ३२ हजार रुपये किमतीचे चांदीचे पैंजण, बिंदली, छल्ला, मासळी आदी तसेच ३० हजार रुपये रोख रक्कम असा एकूण ६२ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com