Uruli Kanchan : महात्मा गांधी आणि मणिभाई देसाई यांचे विचार आजही महत्त्वाचे; पुण्यतिथीनिमित्त डॉ. हेगडे यांचे प्रतिपादन

33rd Death Anniversary of Gandhian Thinker Dr Manibhai Desai Observed : उरुळी कांचन येथे पद्मश्री डॉ. मणिभाई देसाई यांची ३३ वी पुण्यतिथी विविध संस्थांच्या वतीने साजरी करण्यात आली. निसर्गोपचार आश्रमात त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
33rd Death Anniversary of Gandhian Thinker Dr Manibhai Desai Observed

33rd Death Anniversary of Gandhian Thinker Dr Manibhai Desai Observed

esakal

Updated on: 

सुनील जगताप

उरुळी कांचन:- ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत,दुध क्रांतीचे प्रणेते पद्मश्री डॉ.मणिभाई देसाई यांची १४ नोव्हेंबरची ३३ वी पुण्यतिथी उरुळी कांचन मधील विविध संस्थांच्या वतीने त्यांना आदरांजली वाहत साजरी करण्यात आली.

राष्ट्रपिता महात्मा गांधी संस्थापित निसर्गोपचार आश्रम संस्थेत संस्थेचे कार्यकारी विश्वस्त डॉ.एन.जी हेगडे यांनी डॉ.मणिभाई देसाई यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली समर्पित केली. याप्रसंगी विश्वस्त माऊली कांचन, निसर्गोपचार आश्रमचे संचालक डॉ.अभिषेक देवीकर,माजी उपसरपंच दत्तात्रय कांचन,डॉ अमेया देविकर,शंकर चौधरी,सतिश सोनवणे,सर्व डॉक्टर्स,कर्मचारी,रुग्ण साधक,उरुळी कांचन गावचे प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ हेगडे म्हणाले की,महात्मा गांधी व मणिभाई यांचे विचार,तत्व मूल्ये आजच्या परिस्थितीत खूप महत्वाची आहेत. शारीरिक आरोग्याबरोबर आता मानसिक आरोग्यावर देखील भर दिला पाहिजे. त्यांची जीवन तत्व मूल्ये यांचा प्रसार करून प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांवर योग्य संस्कार करण्याची सद्य स्थितीत आवश्यकता आहे .

डॉ.मणिभाई देसाई पतसंस्थेत देखील पुण्यतिथीनिमित्त डाॅ.मणिभाई देसाई यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली समर्पित करण्यात आली.याप्रसंगी ज्येष्ठ नेते प्रा. के.डी.कांचन,संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कांचन,उपाध्यक्ष रामदास चौधरी,शरद वनारसे, लक्ष्मण वाल्हेकर,ऋषिकेश भोसले,अजय पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

डॉ.मणिभाई देसाई कृषी विकास प्रतिष्ठानच्या कार्यालयात प्रतिमा पूजन करुन आदरांजली समर्पित करण्यात आली याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष सुनील गोते, सचिव रोहिदास कोतवाल,ज्येष्ठ विश्वस्त संजय टिळेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...