माणिकडोहात 75 टक्के पाणीसाठा

Manikdoh Dam 75% Water Resource
Manikdoh Dam 75% Water Resource
Updated on

जुन्नर : माणिकडोह ता. जुन्नर येथील शहाजी सागर जलाशयात यावर्षी आज सोमवारी (ता.10) अखेर 7 हजार 211 दशलक्ष घनफुट नवीन पाणी आले असून धरणात गेल्यावर्षी इतका 75 टक्के पाणीसाठा झाला असल्याची माहिती शाखा अभियंता काशीनाथ देवकर यांनी दिली. या वर्षीच्या पावसाळ्यात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाला. जून महिन्यापासून कुकडी नदीतून धरणात नविन पाणी येण्यास सुरुवात झाली.

आज अखेर धरणातील उपयुक्त पाणीसाठा 7 हजार 608 दशलक्ष घनफुट इतका आहे. तर गेल्या वर्षी तो 7 हजार 686 इतका होता. धरणाची टक्केवारी 75.50 इतकी होती. यावर्षी आज अखेर एकूण 777 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे, तर गेल्या वर्षी 958 मिलिमीटर इतका पाऊस झाला होता. सप्टेंबर अखेर पर्यत पावसाची शक्यता असल्याने पाणीसाठ्यात आणखी वाढ अपेक्षित आहे. गेल्या वर्षापेक्षा पावसाचे प्रमाण यावर्षी कमी आहे. यामुळे पाणीसाठ्यात थोडी कमी वाढ झाली आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com