विरोधकांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रकार दुर्देवी - खा. सुप्रिया सुळे

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) केलेली झाडाझडती हा विरोधकांचा आवाज दडपण्याचा प्रकार आहे.
MP Supriya Sule
MP Supriya SuleSakal
Summary

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) केलेली झाडाझडती हा विरोधकांचा आवाज दडपण्याचा प्रकार आहे.

दौंड - दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) केलेली झाडाझडती हा विरोधकांचा आवाज दडपण्याचा प्रकार आहे. विरोधकांची प्रतिमा मलिन करण्याचा हा प्रकार दुर्देवी आहे, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

दौंड शहरात पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले. खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'जो विरोधात बोलतो त्याच्यावर कुठली न कुठली धाड टाकली जाते व त्याची तपशीलवार आकडेवारी आमच्याकडे उपलब्ध आहे. परंतु सत्ताधारी ज्यांच्यावर भ्रष्टाचार किंवा अन्य आरोप करतात त्या व्यक्ती जेव्हा त्यांच्या पक्षात जातात तेव्हा हेच आरोप विरघळून जातात. भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची एक देश - एक पक्ष, ही भूमिका दडपशाहीची आहे. आम्ही मात्र राज्यघटनाप्रेमी असून आमचा निवडणूक आयोगावर विश्वास आहे.'

त्या पुढे म्हणाल्या, 'राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी घाई करण्यात आली. परंतु आज दोन महिन्यानंतरही पुणे जिल्ह्यासाठी पालकमंत्री नियुक्त करण्यात न आल्याने शिक्षण, आरोग्य, आदी सर्वसामान्यांशी निगडित कामांविषयीचे निर्णय रखडले आहेत.'

निर्मला सीतारमण यांचे जंगी स्वागत केले पाहिजे

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण बारामती मतदारसंघाचा दौरा करणार असतील तर आपण सगळ्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले पाहिजे. दिवंगत माजी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी देखील विकासकामांसाठी बारामतीचा दौरा केला होता. बारामती सर्वांना हवी असते. या मतदारसंघात काहीतरी विशेष आहे, म्हणूनच लक्ष घातले जात असेल, अशी टिप्पणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com