

Ganesh mandals warned of strict action for rule violations.
Sakal
मांजरी खुर्द : सार्वजनिक गणेशोत्सव अधिकाधिक चैतन्यमय आणि शांततेने साजरा व्हावा या दृष्टीने नियोजन केले जात आहे. त्यासाठी मंडळांनी सहकार्य करणे आवश्यक असून उत्सवासाठी पोलीस व ग्रामपंचायतीची परवानगी घेणे बंधनकारक आहे. उत्सव काळात ध्वनिक्षेपकाची मर्यादा पाळावी, मिरवणुकीतील देखाव्याची उंची मर्यादित ठेवावी तसेच, महिलांना त्रास होणार नाही, याची दक्षता सर्व मंडळांनी घ्यावी. अन्यथा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर गुन्हे दाखल होतील, असा इशारा वाघोली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी दिला.