Pune Deadly Road: मांजरी खुर्द–कोलवडी रस्ता मृत्यूचा सापळा; खड्डे, अवजड वाहतूक आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक हैराण

मांजरी खुर्द–कोलवडी रस्त्यावर खड्डे, उखडलेले साईडपट्टे आणि बेदरकार अवजड वाहतुकीमुळे प्रवाशांचा जीव मुठीत; प्रशासनाच्या विलंबामुळे नागरिक संतप्त
मांजरी खुर्द : येथील कोलवडी रस्त्यावर मोठ्याप्रमाणावर खड्डे पडले असून वाहतुकीला धोका निर्माण झाला आहे.

मांजरी खुर्द : येथील कोलवडी रस्त्यावर मोठ्याप्रमाणावर खड्डे पडले असून वाहतुकीला धोका निर्माण झाला आहे.

Sakal

Updated on

मांजरी खुर्द : वाढते नागरीकरण, रहदारी आणि वाहनांची संख्या यामुळे मांजरी खुर्द - कोलवडी (ता. हवेली) हा सुमारे साडेचार किलोमीटरचा रस्ता अगोदरच धोकादायक झाला आहे. त्यातच फुटा फुटावर निर्माण झालेले रस्त्यावरील खड्डे, कुठे गायब तर कुठे उखडलेल्या साईड पट्ट्या आणि मिक्सर, डंपर सारख्या अवजड वाहनांची होणारी बेदरकार वाहतूक यामुळे हा रस्ता मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. प्रवाशांना कमालीचा धोका निर्माण झाला आहे. लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या वारंवार बदलणाऱ्या अश्वासनांमुळे नागरिक व प्रवासी हैराण झाले असून या रस्त्यावरील वाहतूक सुरक्षित कधी होईल, असा सवाल त्यांच्याकडून केला जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com