

Pune
esakal
कृष्णकांत कोबल
मांजरी खुर्द: येथील मांजरी खुर्द - कोलवडी (ता. हवेली) रस्त्याची मोठ्याप्रमाणात चाळण झाली असून त्यावरून प्रवास करताना वाहनचालकांसह पादचाऱ्यांनाही नाकी नऊ आले आहे. गेली अनेक वर्षांपासून मागणी करूनही प्रशासन गांभीर्याने लक्ष देत नसल्याने हतबल प्रवाशांनी "रूंदीकरण राहूदेत किमान खड्डे तरी बुजवा," असे साकडे घातले आहे.