esakal | Manohar Mama Bhosale | बारामती न्यायालयाकडून मनोहर भोसलेला जामिन मंजूर
sakal

बोलून बातमी शोधा

मनोहर भोसले

Manohar Mama Bhosale | बारामती न्यायालयाकडून मनोहर भोसलेला जामिन मंजूर

sakal_logo
By
कल्याण पाचांगणे, माळेगाव

माळेगाव : अघोरी पद्धतीने उपचार आणि आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी बारामती तालुका पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात मनोहरमामा उर्फ मनोहर भोसले याला आज जिल्हा व सत्र न्यायाधिश  एस. टी. भालेराव यांनी जामिन मंजूर केला. तसेच वरील प्रकरणातील सहआरोपी ओंकार शिंदे याचाही जामिन संबंधित न्यायालयाने मंजूर केल्याची माहिती पुढे आली.

मात्र तिसरा संशयित आरोपी नाथबाबा उर्फ विशाल वाघमारे यांचा अटक पुर्व जामिन अर्ज फेटाळला गेला आहे, अशी माहिती तपासाधिकारी तथा पोलिस निरिक्षक महेश ढवाण यांनी दिली. दरम्यान, संशयित आरोपी भोसले व शिंदे यांच्या जामिन अर्जावर न्यायाधिश श्री. भालेराव यांच्या आज समोर सुनावणी झाली. बारामतीत दाखल झालेल्या गुन्ह्यात कायद्यानुसार सात वर्षाखालील शिक्षेची तरतूद आहे, शिवाय भोसले हे करमाळा येथील गुन्ह्यात पोलिसांच्या अटकेत आहेत.

त्यामुळे बारामतीमधील गुन्ह्यात भोसले, शिंदे जामिनास पात्र आहेत, असा युक्तवाद अॅड. रोहित गायकवाड, अॅड. हमेंत नरूटे, अॅड. रणजित गावडे यांचा न्यायालयात महत्वपुर्ण ठरवा. याचवेळी सरकारी वकीलांचा युक्तवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने मनोहर भोसले याला ६० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. दुसरीकडे, सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथे वरील प्रकरणातील संशयित आरोपी मनोहर भोसले हा बलात्काराच्या गुन्ह्यात पोलिसांच्या अटकेत राहणार आहे.

loading image
go to top