
शिरूर : मराठा आरक्षणाचा लढा अंतिम टप्प्यात असून, येत्या २९ ऑगस्टला परत मुंबईवर धडक मारणार असल्याचे मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी येथे सांगितले. मागील वेळी जेवढ्या संख्येने गेलो होतो त्याच्या वीसपट संख्या यावेळी असेल असा निर्धारही त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला.