

KOR26B10649
करमाळा : शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करताना मनोज जरांगे-पाटील यावेळी उपस्थित इतर.
मनोज जरांगे-पाटील यांनी
करमाळा शहराला दिली भेट
करमाळा, ता. ४ : मनोज जरांगे-पाटील यांनी करमाळा शहराला नुकतीच भेट दिली. यावेळी तालुका व शहरातील समाज बांधवांनी फटाक्यांची आतषबाजी करत त्यांचे स्वागत केले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास व छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पाटील त्यांनी पुष्पहार अर्पण केला.
यावेळी मराठा समाजाला ओबीसी, कुणबीचे दाखले मिळण्यासाठी कुर्डुवाडी प्रांत कार्यालयाकडून होत असलेल्या अडवणुकी संदर्भातदेखील जरांगे-पाटील यांच्याशी उपस्थित कार्यकर्त्यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना आंदोलनात्मक पवित्रा घेऊन सदरचा प्रश्न सोडवून घ्यावा अशा प्रकारचा सल्ला दिला. अन्यथा प्रशासन जर समाजाची अशाच प्रकारे पिळवणूक करत असेल तर मलादेखील मैदानात उतरावे लागेल असा प्रशासनाला इशारा दिला.