लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील उत्तीर्ण मनोज पाटील यांचे मंगळवेढा जल्लोष स्वागत

लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील उत्तीर्ण मनोज पाटील यांचे मंगळवेढा जल्लोष स्वागत
Published on

फोटो :PNE26W01743
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन केलेल्या मनोज पाटील यांचा मंगळवेढ्यातील दामाजी चौकात सत्कार करताना खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर आवताडे व जिल्हा परिषद सदस्य प्रदीप खांडेकर.

तरुणांनी मोठी स्वप्ने पाहावीत; यश नक्‍कीच मिळते
मनोज पाटील; दामाजी चौकात मान्यवरांकडून सत्कार
सकाळ वृत्तसेवा
मंगळवेढा, ता. ७ : गावातील आणि तालुक्यातील तरुणांनी मोठी स्वप्ने पाहावीत. स्पर्धा परीक्षांद्वारे आपले करिअर घडविण्याचा प्रयत्न करावा. सातत्य, मेहनत आणि जिद्द असेल तर यश नक्की मिळते, असा विश्‍वास यूपीएससी परिक्षेत यश मिळविलेल्या मनोज रामचंद्र पाटील यांनी व्‍यक्त केला.
केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर झाल्यानंतर मंगळवेढा तालुक्यातील जालिहाळ येथील मनोज पाटील हे रात्री रेल्वेने गावी परतले. गावात येताच त्यांचे स्वागत करण्यात आले. दिवसभर मंगळवेढ्यात विविध राजकीय पक्ष, सामाजिक संस्था व संघटनांच्या वतीने त्यांचा शनिवारी दामाजी चौकात सत्कार करण्यात आला. दुष्काळी भागातील प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवलेल्या या यशामुळे तालुक्यात अभिमानाची भावना निर्माण झाली असून, सत्कार समारंभावेळी त्यांच्या वडिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.
खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर आवताडे यांच्या हस्ते मनोज यांचा सत्कार करण्यात आला. माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनीही त्यांचा सन्मान केला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रदीप खांडेकर, नगरसेवक अनिल बोराडे, सोमनाथ बुरजे, खरेदी-विक्री संघाचे संचालक बसवंत पाटील, हणमंत मासाळ यांच्यासह रामचंद्र पाटील, संगाप्पा पाटील, जयदेव पाटील, विठ्ठल पाटील, शंभू मामा नागणे आदी उपस्थित होते.
जालिहाळसारख्या दुष्काळी गावातून प्रतिकूल परिस्थितीतून पुढे येत मनोज पाटील यांनी मिळवलेले हे यश तालुक्यातील विशेषतः दक्षिण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. मुलाने मिळवलेल्या या यशाचा उल्लेख होताच त्यांच्या वडिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. साध्या कुटुंबातून आलेल्या मनोजच्या यशामुळे गावकऱ्यांमध्येही आनंदाचे वातावरण पसरले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com