मानसिंगराव नाईक वाढदिवसानिमित्त लेख

मानसिंगराव नाईक वाढदिवसानिमित्त लेख
Published on

पान ८ - तातडीने
----------------------------
पुरवणी हेडर ः मा. आमदार मानसिंग (भाऊ) नाईक अभिष्टचिंतन विशेष
-------------
मानसिंगराव नाईक ः विकासाचा ध्यास असणारे नेतृत्व
............
समृद्ध शेतकरी, सहकार आणि ग्रामीण विकास यांना केंद्रस्थानी ठेवून विकासाची नवी वाट निर्माण करणारे विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक हे असेच एक प्रेरणादायी नेतृत्व आहे. दूरदृष्टी, अभ्यासू वृत्ती आणि विकासाचा ध्यास यांच्या बळावर त्यांनी सहकार क्षेत्राला नवी ऊर्जा दिली, तर आधुनिक शेती आणि ग्रामीण भागाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी अनेक उपक्रम यशस्वीपणे राबविले. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आणि समाजहितासाठीच्या अविरत योगदानाचा गौरव करणे म्हणजे विकास, नेतृत्व आणि लोकसेवेच्या एका यशस्वी प्रवासाला सलाम करण्यासारखे आहे.
......................
‘विश्वास’चे उत्कृष्ट व्यवस्थापन :
अध्यक्ष मानसिंगभाऊंनी ‘विश्वास’ कारखान्याचे व्यवस्थापन सक्षम ठेवत कारखाना आर्थिक व तांत्रिकदृष्ट्या भक्कम ठेवला आहे. काळाची पावले ओळखून विश्वास कारखान्यात १ लाख ५ हजार प्रतिदिनी उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती प्रकल्पाची उभारणी केली आहे. या वर्षी ७ हजार ५०० मेट्रिक टन प्रतिदिनी गाळप करण्याच्या दृष्टीने नियोजन सुरू आहे. कर्मचारी पदोन्नती, पगारवाढ, प्रत्येक वर्षी बोनस, दरवर्षी कर्मचाऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी, सभासदांना अल्पदरात साखर, रुग्णवाहिका व अग्निशामक टँकर, ठिबक सिंचन अनुदान योजना, कामगार विमा योजना आदी सोईसुविधा दिल्या जातात. शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी कारखान्यामार्फत विविध योजना राबवीत सोई, सवलती दिल्या जात आहेत. कारखान्यामार्फत राबविण्यात आलेल्या विविध पाणी योजनांना शासनाकडून कर्जमाफी मिळवून बहुतांशी शेतकरी कर्जमुक्त केले आहेत. कारखान्याचे एकूण कामकाजाची दखल घेऊन टी.यू.व्ही. या जर्मन कंपनीकडून कारखान्यास आय.एस.ओ.९००१-२०१५ हे मानांकन देण्यात आले आहे.

कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण ः
‘विश्वास’ने नेहमी शेती व शेतकऱ्यांच्या प्रगतीला प्राधान्य दिले आहे. हुकमी पीक म्हणून ऊस शेतीकडे पाहिले जाते. ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान आले आहे. या अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड व ठिबक सिंचनाचा वापर शेतकऱ्यांनी केल्यास शेती अधिक फायदेशीर होते.खर्चातही मोठी बचत होऊ शकते. ठिबक सिंचनासाठी कारखाना एकरी पाच हजार रुपये अनुदान कारखाना देत आहे. या तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार कारखान्याच्या शेती विभागामार्फत केला जात आहे. गावोगाव तंत्रज्ञनाबद्दलची माहिती व वापर याची माहिती तज्ज्ञांमार्फत शेतकऱ्यांना दिली जात आहे. या तंत्रज्ञानाचा ऊस उत्पादन वाढीसाठी चांगला फायदा होत आहे. कारखान्यांच्या पुढाकारातून शेतकरी आधुनिक ऊस शेतीकडे वळला आहे.

‘विश्वास’ समृद्ध शेतकरी अभियान :
या अभियानामध्ये शेतकऱ्यांना बांधापर्यंत पोहोचून ऊस तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन दिले जाते. अभियानात निवडलेल्या ऊस क्षेत्राला संपूर्ण निविष्ठा कारखान्यामार्फत देण्याचा विचार आहे. ऊस उत्पादन वाढीत एक-दोन वर्षांमध्ये परिणाम दिसून येत नाहीत. यासाठी कारखान्याने चार ते पाच वर्षांचा विचार करून ऊस विकास योजना राबविण्याचे काम हाती घेतलेले आहे. शेतकऱ्यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे सर्व बाबींचा वापर केल्यास अपेक्षित उत्पादन मिळते. पुढील गाळप हंगामामध्ये या योजनेत सहभागी शेतकऱ्यांचा ऊस गाळपास येणार असून अपेक्षित उत्पादन पातळी नक्की गाठली जाईल, याची खात्री आहे.
------------------
अमोल पाटील (कार्यकारी संचालक, विश्वास कारखाना)
------------------------------------------
शब्दांकन ः शिवाजी चौगुले, शिराळा
---------------
फोटो ः
मानसिंगराव नाईक
अमोल पाटील

----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com