esakal | 'माणूस'कार श्री. ग. माजगावकर पुरस्कार श्रीकांत बहुलकर यांना जाहीर
sakal

बोलून बातमी शोधा

dr Shrikant Bahulkar

'माणूस'कार श्री. ग. माजगावकर पुरस्कार श्रीकांत बहुलकर यांना जाहीर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : राजहंस प्रकाशन आणि डॉ. रा. चिं. ढेरे संस्कृति-संशोधन केंद्र यांच्या सहयोगाने 'माणूस'कार श्री. ग. माजगावकर (Shri g Majgaonkar) यांच्या स्मृतीसाठी दरवर्षी दिला जाणारा श्री. ग. माजगावकर पुरस्कार (Award) बौद्ध धर्म आणि तत्त्वज्ञानाचे अभ्यासक, ज्येष्ठ संस्कृतज्ञ डॉ. श्रीकांत बहुलकर (Shrikant Bahulkar) यांना जाहीर झाला आहे. ४० हजार रुपये, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. (Manuskar Shri g Majgaonkar Award Announced dr Shrikant Bahulkar)

हेही वाचा: नियोजन समितीवरील सदस्यांची नियुक्ती; आमदार, खासदारांसह तीस सदस्यांचा समावेश

१ ऑगस्ट हा श्री. ग. माजगावकर यांचा जन्मदिन. या दिवसाचे औचित्य साधून हा पुरस्कार डॉ. बहुलकर यांना प्रदान केला जाईल. राजकीय आणि सामाजिक क्षेत्राबद्दल सजग असणाऱ्या श्री. ग. माजगावकरांनी १९६१ साली 'माणूस' साप्ताहिक सुरु केले. जबाबदार आणि सुसंस्कृत नागरिक निर्माण करण्यासाठी 'माणूस' चा प्रारंभ झाला. “समाजासहित आपली उन्नती साधा - अभिराष्ट्रेण वर्धताम्” हे 'माणूस'चे ध्येयवाक्य होते. आत्मनिर्भर राष्ट्रवाद आणि सामाजिक-आर्थिक-सांस्कृतिक समतावाद या दोन प्रेरणांचा समन्वय साधण्यासाठी विविध विचारधारांना श्री. ग. मा. खुल्या मनाने सामोरे गेले.

हेही वाचा: दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनअभावी देशात एकही मृत्यू नाही - केंद्र सरकार

त्यांच्या स्मृतीचा पुरस्कार देऊन महाराष्ट्राच्या वैचारिक समृद्धीसाठी सातत्याने प्रयत्नशील असलेले विचारवंत, ज्ञानोपासक अथवा अभ्यासक यांना दरवर्षी सन्मानित करावे, अशी या पुरस्कारामागची भावना आहे. २०१९ ते २०२९ अशी ११ वर्षे हा पुरस्कार देण्यात येईल. श्री. ग. माजगावकर यांच्या जन्मशताब्दी वर्षात म्हणजे सन २०२९ मध्ये या पुरस्काराची सांगता होईल, असी माहिती डॉ रा. चिं. ढेरे संस्कृति संशोधन केंद्राच्या सचिव वर्षा गजेंद्रगडकर यांनी दिली.

loading image