मुंबईत १ सप्टेंबरला भव्य आंदोलन ः हाके

मुंबईत १ सप्टेंबरला 
भव्य आंदोलन ः हाके
Published on

इंदापूर, ता. १८ ः मराठा समाजाला थेट ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळत नसल्याने कुणबी दाखल्यांच्या माध्यमातून ओबीसीमध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या प्रक्रियेमुळे मूळ ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या हक्कावर गदा येत असून, सरकारने याकडे दुर्लक्ष केल्यास ओबीसी समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मंगळवारी (ता. १८) इंदापूरला दिला. ओबीसी समाजाच्या विविध प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी १ सप्टेंबरला मुंबईत भव्य मोर्चा काढण्यात येणार असून, ओबीसींचा ‘जगन्नाथाचा रथ’ आता थांबणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. इंदापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर सरकार तसेच मनोज जरांगे आणि विविध राजकीय पक्षांच्या भूमिकेवर टीका केली. ते म्हणाले, ‘एखाद दुसरा अपवाद वगळता ओबीसींच्या बाजूने ना मंत्री बोलतात, ना विरोधक बोलतात, ना आमदार-खासदार बोलतात. ओबीसी समाजाच्या प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com