Maratha Reservation : बारामतीत मराठा आंदोलकांच्या वतीने अन्नत्याग आंदोलन सुरू

आज पासून 24 तास उपोषण करण्याचा मार्ग देखील आंदोलकांच्या वतीने अवलंबला जाणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आली
Maratha Reservation
Maratha ReservationEsakal
Updated on

बारामती : मराठा आरक्षण आंदोलनाची तीव्रता राज्यभर अधिकच वाढत असताना बारामतीतील मराठा समाज बांधवांनी देखील आपले आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे.

येथील मराठा समाजातील विजय गोपाळराव तावरे, अमरजीत सुदामराव जगताप, गोविंद भाऊसाहेब वाघ, धनराज रणजीतसिंह नाईक निंबाळकर या चार कार्यकर्त्यांनी आजपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान प्रशासनाच्या वतीने देखील वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून आंदोलकांच्या तब्येतीवर काल रात्रीपासूनच डॉक्टरांचे पथक बारकाईने लक्ष ठेवून आहे.

दरम्यान आज पासून 24 तास उपोषण करण्याचा मार्ग देखील आंदोलकांच्या वतीने अवलंबला जाणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आली. बारामती शहरासह बारामती तालुक्याच्या अनेक भागातून मराठा समाजाचे बांधव या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दररोज हजेरी लावत आहेत बारामतीत हे आंदोलन अत्यंत शांततेत सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com