मराठा आरक्षणप्रश्नी संभाजीराजे उपोषणाच्या तयारीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune

मराठा आरक्षणप्रश्नी संभाजीराजे उपोषणाच्या तयारीत

पुणे : मराठा आरक्षणप्रश्नी छत्रपती संभाजीराजे भोसले (Chhatrapati Sambhaji Raje Bhosale) हे उपोषणाच्या तयारीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पुण्यातील (Pune) नऱ्हे येथे एका खासगी कार्यक्रमासाठी ते उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

हेही वाचा: किरीट सोमय्यांनी शेतकरी आणि सभासदांशी साधला संवाद;पाहा व्हिडिओ

यावेळी बोलताना संभाजीराजे म्हणाले, मला सरकारने आझाद मैदानावर उपोषण करण्यासाठी भाग पाडू नये. लवकर निर्णय घ्यावा. आरक्षणासाठी मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं, पण त्यांची उत्तर उत्तरे म्हणजे सरकारी बाबूंनी दिलेली उत्तरे आहेत. आता चर्चा खुप झाली, ज्या दिवशी मराठा समन्वयक सांगतील त्यादिवशी मी आझाद मैदानात उपोषणाला बसणार आहे.

त्याचबरोबर, आरोग्य विभागाच्या राज्य सरकारच्या परीक्षा रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे भोसले म्हणाले, अशा पद्धतीने परीक्षा रद्द होणे दुर्देवी आहे. 'आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत गरजा आहेत. याबत दिली सरकारने चांगले काम केले आहे. त्यांचा आदर्श आपणही घ्यायला हवा. विद्यार्थ्यांना सरकारने प्रवास खर्च देण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.

Web Title: Maratha Reservation Issue Sambhaji Raje Preparing For Fast

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :pune
go to top