संभाजीराजे छत्रपती
संभाजीराजे छत्रपतीsakal

आरक्षणावर मुख्यमंत्र्यांचा रिप्लाय म्हणजे सरकारी बाबूंचे उत्तर - संभाजीराजे

मराठा आरक्षणप्रश्नी छत्रपती संभाजीराजे भोसले हे उपोषणाच्या तयारीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पुणे : मराठा आरक्षणप्रश्नी छत्रपती संभाजीराजे भोसले हे उपोषणाच्या तयारीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पुण्यातील नऱ्हे येथे एका खासगी कार्यक्रमासाठी ते उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना संभाजीराजे म्हणाले, मला सरकारने आझाद मैदानावर उपोषण करण्यासाठी भाग पाडू नये. लवकर निर्णय घ्यावा.

संभाजीराजे छत्रपती
अजित पवारांनीच दाबले रेल्वेचे नाक ! तोंड उघडण्याची प्रतिक्षा..

आरक्षणासाठी मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं, पण त्यांची उत्तर उत्तरे म्हणजे सरकारी बाबूंनी दिलेली उत्तरे आहेत. आता चर्चा खुप झाली, ज्या दिवशी मराठा समन्वयक सांगतील त्यादिवशी मी आझाद मैदानात उपोषणाला बसणार आहे.

त्याचबरोबर, आरोग्य विभागाच्या राज्य सरकारच्या परीक्षा रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे भोसले म्हणाले, अशा पद्धतीने परीक्षा रद्द होणे दुर्देवी आहे. 'आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत गरजा आहेत. याबत दिली सरकारने चांगले काम केले आहे. त्यांचा आदर्श आपणही घ्यायला हवा. विद्यार्थ्यांना सरकारने प्रवास खर्च देण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com