Maratha Reservation : प्रतिक्षा, उत्साह, जयघोष व गर्दीने रस्ता भगवामय

जुनी सांगवी, पिंपळे गुरव, पिंपळे निलख, दापोडी, नवी सांगवी परिसरातील सकल मराठा समाजाच्या वतीने पदयात्रेच्या स्वागतासाठी तयारी करण्यात आली.
Juni Sangavi
Juni Sangavisakal

जुनी सांगवी - मराठा आरक्षणासाठी अंतरवली सराटी ते मुंबई पदयात्रा पिंपरी चिंचवड शहरातून जात असताना पिंपरी चिंचवड शहराचे प्रवेशद्वार असलेल्या सांगवी फाटा येथून संपूर्ण रस्त्यावर पदयात्रेतील मराठा समाज बांधवांसाठी ठिकठिकाणी सेवा व्यवस्था करण्यात आली.

बुधवार ता. २४ सकाळी ९ वाजल्यापासून जुनी सांगवी, पिंपळे गुरव, पिंपळे निलख, दापोडी, नवी सांगवी परिसरातील सकल मराठा समाजाच्या वतीने पदयात्रेच्या स्वागतासाठी तयारी करण्यात आली. सांगवी फाटा, रक्षक चौक, जगताप डेअरी, दरम्यान ठिक ठिकाणी स्वागत कमानी, कॉर्नर मंडप उभारण्यात आले होते.

खराडी येथून पदयात्रा निघून सकाळी १० पर्यंत सांगवी फाटा येथे पोचणार असल्याचे निरोप कळविण्यात आल्याने सकाळपासूनच सकल मराठा बांधवांकडून व्यवस्थेची लगबग सुरू होती.यात विविध सामाजिक संघटना, राजकीय मंडळीनी स्वागताची जय्यत तयारी पदयात्रा मार्गावर करण्यात आली. सांगवी फाटा ते रक्षक चौक जगताप डेअरी मार्गावर अल्पोहार, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, खिचडी, केळी वाटपासाठी ठेवण्यात आल्या होत्या.

सकल मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढ्यासाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. चलो मुंबई, एक मराठा लाख मराठा अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. सकाळपासूनच पिंपरी चिंचवड शहर वाहतूक पोलिस विभागाकडून रहदारीसाठी चोख व्यवस्था व बंदोबस्त ठेवण्यात आला.

प्रतिक्षा,उत्साह व झाडांच्या सावलीचा आधार - रस्त्याच्या कडेला स्वागतासाठी झालेली गर्दी, ध्वनीक्षेपकावर मराठा आरक्षणाबाबत लावलेली गाणी वाजवताना रक्षक चौकात महिला भगिनींनी घोषणा देत फेर धरला. उत्साह, उत्सुकता प्रतिक्षा करत अनेक ज्येष्ठांनी रस्त्याकडेला झाडांच्या सावलीचा आधार घेत ठाण मांडले होते.

पॉईंटर -

सांगवी फाटा ते डांगे चौक दरम्यान ठिक ठिकाणी पुष्पवृष्टी करण्यासाठी सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने जेसीबी, फुलांनी भरलेले ट्रॅक्टर उभा करण्यात आले होते.

- ढोलवाद्यांच्या गजरात स्वागत करण्यासाठी परिसरातील विविध ढोलताशा पथकांना पाचारण करण्यात आले होते.

- पदयात्रेतील पाच हजार बांधवांसाठी जेवणाची व्यवस्था सांगवी फाटा दरम्यान मार्गावर पाचशे डझन केळी, नाष्टा, पाणी बाटली, बाॅक्स, साधारण एक हजार भगव्याटोप्या, ताफ्यातील बैलगाडीच्या बैलांसाठीही खुराक इ. व्यवस्था मार्गावर करण्यात आली.

राजकीय - वैयक्तिक हेवेदावे विसरून सकल मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सांगवी, पिंपळे गुरव, नवी सांगवी, पिंपळे निलख व परिसरातील मंडळी एकत्र आल्याचे चित्र पदयात्रा मार्गावर दिसत होते.

दहा वाजताची वेळ रात्री कळल्याने सकाळपासूनच सांगवी फाटा येथे स्वागतासाठी ज्येष्ठ नागरिकांसह उपस्थित राहिलो.

- बबन शितोळे सल्लागार अखिल सांगवी ज्येष्ठ नागरिक संघ.

सकल मराठा समाज संघर्ष योद्ध्याला व पदयात्रेतील सकल मराठा समाज बांधवांच्या व्यवस्थेसाठी गेली दोन दिवसांपासून तयारी करण्यात आली.सर्वांनीच आप आपल्या परीने सहभागी होवून यात खारीचा वाटा उचलला आहे.

- शिवाजी पाडुळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com