चार विद्यमान आमदारांसह ३० आरोपी न्यायालयात हजर

चार विद्यमान आमदारांसह ३० आरोपी न्यायालयात हजर
Published on

चार विद्यमान आमदारांसह
३० संशयित न्यायालयात हजर

मराठा क्रांती मोर्चा आंदोलन प्रकरण; ४८ जणांविरुद्ध गुन्हा

सोलापूर, ता. २९ : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ४ जुलै २०२१ रोजी काढण्यात आलेल्या मराठा क्रांती मोर्चाप्रकरणी दाखल गुन्ह्यात चार आमदारांसह ३० संशयित शनिवारी (ता. २९) प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्री. शिंदे यांच्या न्यायालयात हजर झाले. या प्रकरणात एकूण ४८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल असून, त्यापैकी ३० संशयितांनी न्यायालयात हजेरी लावली.
या प्रकरणातील संशयितांत आमदार विजयकुमार देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, समाधान आवताडे आणि राजेंद्र राऊत यांच्यासह माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे व माजी खासदार जयसिद्धेश्वर महाराज यांचा समावेश आहे.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर महानगरपालिकेने मोर्चाला परवानगी नाकारली होती. मात्र, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राम जाधव व किरण पवार यांनी ४ जुलै २०२१ रोजी मोर्चाचे आयोजन केले. या मोर्चात सहभागी झालेल्या लोकांविरुद्ध फौजदार चावडी पोलिस ठाण्यात पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ देशमाने यांनी फिर्याद दाखल केली होती.
या प्रकरणाचा तपास पूर्ण करून पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. त्यानंतर न्यायालयाकडून आरोपींना समन्स बजावण्यात आले. त्यानुसार विजयकुमार देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, समाधान आवताडे, राजेंद्र राऊत यांच्यासह इतर आरोपी शनिवारी न्यायालयात हजर झाले. संशयितांच्या वतीने ॲड. संतोष न्हावकर, ॲड. सचिन साखरे, ॲड. राहुल रूपनर, ॲड. बाबासाहेब जाधव, ॲड. राज म्हात्रे आणि ॲड. अजिंक्य जाधव यांनी काम पाहिले. सरकारतर्फे ॲड. संतोष पाटील यांनी बाजू मांडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com