

सरकारचे शिष्टमंडळ
आमची मजा पाहत आहे
मनोज जरांगे यांचा आरोप, सरकारला चर्चा करायची नाही
वडिगोद्री, जि. जालना : ‘‘सरकारची आमच्याशी चर्चा करण्याची तयारी नसून, त्यांचे शिष्टमंडळ छत्रपती संभाजीनगर येथे बसून आमची मजा पाहत आहे,’’ असा आरोप मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला.
जरांगे यांच्या उपोषणाचा बुधवारी (ता. २) पाचवा दिवस होता. त्यावेळी पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
जरांगे म्हणाले, ‘‘५८ लाख नोंदी सापडल्या आहेत, तरी सरकार कुणबी प्रमाणपत्र देत नाही. यावरून सरकार सकारात्मक विचार करत नसून, त्यांची भूमिका वेगळी असल्याचे लक्षात येते. आम्हाला मारहाण करणे तुम्हाला परवडणार नाही. आम्ही जशास तसे उत्तर देणार. सध्या ओबीसींचे उपोषण मुंबईत होत आहे. तेही आमचे बांधव आहेत. अन्यथा आम्ही मुंबईत गेलो असतो. आधी त्यांचे आंदोलन होऊ द्या, मग आम्ही मुंबईत जाणार आहोत. सरकार मराठा, ओबीसी या समाजांना वेड्यात काढत आहे. मात्र, आम्ही सर्व मिळून सरकारला धडा शिकवू.’’
‘‘हैदराबाद गॅझेटियर लागू करत नाही, गुन्हे मागे घेत नाही, रद्द झालेले चार प्रमाणपत्रे देत नाही. प्रलंबित मागण्यांची पूर्तता होत नाही, तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही. १२ तारखेपर्यंत तुम्ही मजा घ्या. यानंतर मात्र आम्ही मुंबईला येणार आहोत. सरकारने अध्यादेश काढावा. तो चुकीचा असेल तर आम्ही दुरुस्ती करून देऊ. अध्यादेश बरोबर असेल तर उपोषण सोडून देऊ,’’ असेही ते म्हणाले.
‘‘उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांनी संजय शिरसाट यांनी प्रमाणपत्रे रद्द केली, नुकसान केले. शिंदे यांच्या राजकारणाशी आमचा संबंध नाही. समाज त्यांना विसरणार नाही,’’ असे जरांगे पाटील यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.