
प्रज्वल रामटेके
पुणे : गुणवत्तेच्या आधारे शिष्यवृत्ती मिळवून परदेशात उच्च शिक्षणासाठी गेलेल्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांना सध्या सरकारी दुर्लक्ष आणि प्रशासकीय ढिसाळतेचा फटका बसत आहे. छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) यांच्यामार्फत ‘महाराजा सयाजीराव गायकवाड परदेशी शिष्यवृत्ती योजना’ राबविण्यात येते.