मराठी, हिंदी चित्रपट अभिनेत्री ललिता देसाई उर्फ आशू यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 16 September 2020

देसाई या दादा कोंडके यांच्या सहकारी असत. त्या आचार्य अत्र्यांच्या 'ब्रह्मचारी' नावाच्या नाटकात किशोरीची भूमिका करत असत.  त्यांनी कब क्यू और कहां, सीता और गीता, यादों की बारात आदी अनेक हिंदी चित्रपटांत काम केले होते.

पुणे : मराठी आणि हिंदी चित्रपटातील अभिनेत्री ललिता देसाई उर्फ आशू (वय 75) यांचे आज पुण्यात दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांना किडनीचा विकार होता
.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

देसाई या दादा कोंडके यांच्या सहकारी असत. त्या आचार्य अत्र्यांच्या 'ब्रह्मचारी' नावाच्या नाटकात किशोरीची भूमिका करत असत.  त्यांनी कब क्यू और कहां, 
सीता और गीता, यादों की बारात आदी अनेक हिंदी चित्रपटांत काम केले होते.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अत्र्यांच्या ’लग्नाची बेडी'चे अनेक नामवंत कलावंतांच्या संचांत हजारो प्रयोग झाले. त्यातील ’रश्मी' या भूमिकेला लोकप्रिय आणि संस्मरणीय करण्यात नटवर्य बापूराव मान्यांपासून स्नेहप्रभा प्रधान, हंसा वाडकर, पद्मा चव्हाण, अश्विनी भावे यांच्याबरोबर आशू यांचाही वाटा आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi and Hindi film actress Lalita Desai alias Ashu passed away