
पुणे : दर्जेदार मराठी चित्रपटांना अर्थसाह्य देण्याची चित्रपट अनुदान प्रक्रिया निर्मात्यांसाठी सुलभ आणि गतिमान करण्याचा प्रयत्न गोरेगावच्या दादासाहेब फाळके चित्रनगरीकडून होत आहे. त्यासाठी या प्रक्रियेबाबत समाजमाध्यमांवर वेळोवेळी माहिती देणे, प्रक्रियेतील क्लिष्टता कमी करणे, कमीत कमी टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण करणे आदी पावले उचलण्यात आली आहेत. महिला दिग्दर्शकांना प्रोत्साहनपर अनुदान, आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरील महोत्सवात पुरस्कार मिळालेल्या चित्रपटांना दुप्पट अनुदान, अशा विशेष योजनाही याअंतर्गत राबवल्या जात आहेत.