शब्दकोडे क्रमांक एकवीस - सप्तरंग

शब्दकोडे क्रमांक एकवीस - सप्तरंग
Published on

सप्तरंग - शब्दकोडे २१
------------------
आडवे शब्द :
१) नीरा आणि भीमा नद्यांच्या संगमावर पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील एक तीर्थक्षेत्र जेथे भगवान श्री लक्ष्मीनरसिंह मंदिर आहे ६) प्रयत्न किंवा खटपट न करता ९) उद्देशावाचून सख्खा भाऊ किंवा बहीण, स्वभावसिद्ध १०) झाडाची पाने वगैरे, पाला ११) पूर्ण नसलेला, अपूर्ण १४) दगडाचा खल, चूर्ण करण्याचे दगडी पात्र १६) पांघरण्याचे एक उंची वस्त्र, शाल १७) छत्रपती शिवाजी महाराजांचा एक किल्ला ज्याला सिद्दी जौहरने वेढा घातला होता १९) पाणथळ किंवा चिखलाची जमीन २१) वेढा, वेटाळे, गराडा, फेरा, पकड २३) मोठी टोपली २५) विश्‍वासघात करणारा २७) वेगाने वाहणारी हवा, वारा २९) वारा, वात, हवा ३१) सतत, निरंतर, अविरत ३३) एक औषधी वनस्पती ३४) पोट लांब म्हणून गणपतीला असेही नाव पडले ३५) आठवड्यातील कोणताही दिवस, आघात, घाव ३६) बसक्या नाकाची ३८) तोटा, नुकसान, घागर, घडा, हानी ३९) वेशीवरचा पहारेकरी ४१) टोळी, समूह, टीम, तुकडी, जथ्था ४३) दणकट, धट्टाकट्टा, कणखर ४५) लक्ष्मीचा पती, विष्णू ४७) शेतीला पाणी देण्यासाठी खोदलेला चर, नहर, पाट ४८) जीभ, जिव्हा, किराणा दुकानदार ४९) महाकाय, महाबली, भीम, महापराक्रमी ५१) जखमेवर लावण्याचे औषध ५२) ओझे, पेंढी ५४) शरीर, देह, काया, कुडी ५५) मिठी, आलिंगन, कवटाळून धरण्याची क्रिया ५६) एक प्रकारचे साधे जेवण ५९) वाचून, विना ६०) लष्कराचे एक वाहन ज्यावर तोफा चढविलेल्या असतात ६१) श्रीरामाची पत्नी, जानकी ६२) केळी पिकण्यासाठी प्रसिद्ध असलेला महाराष्ट्रातील एक जिल्हा.
उभे शब्द :
२) ऊस किंवा फळातील द्रव, स्वाद, चव, गोडी ३) किल्ल्याचे पूर्वी नाव ‘कोंडाणा’ असे होते ४) वाद्यांचा मोठा आवाज ५) तडाखा, सपाटा, दणका ६) गवत किंवा पीक कापण्याचे हत्यार ७) एक दुचाकी वाहन ८) सरकारी शिक्कापत्र, प्रमाणपत्र ११) नियम म्हटला की हा आलाच, नियमाला बाधक गोष्ट १२) मग, नंतर, परत १३) एक ज्वालाग्राही पदार्थ १५) विष, जहर, सापाचे विष १६) अंगरखा; शर्ट १८) ही संपल्यानंतर वैद्य मेला तरी चालतो अशी आवश्‍यकता २०) छोटा; लघू; सान २१) ओसाड जागेतील वास्तव्य २२) मातीच्या भांड्याचा फुटका तुकडा २४) नवनाथांपैकी एक ज्यांची समाधी अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात आहे २६) कलंक, डाग, दोष, दृष्ट लागू नये म्हणून लहान मुलाच्या गालावर बोटाने काजळाचा ठिपका लावतात तो २८) वडिलोपार्जित चालत आलेली जमीन वगैरे मालमत्ता २९) एक मोठा साप, अजगर ३०) सर, हार; माळ (फटाक्यांची वगैरे) ३२) मनापासून नसलेला किंवा केवळ दिखाऊ; वरवर दिसणारा ३३) शंभर लाख ३४) उपवास, अनाहार, आयुर्वेदानुसार पचनसंस्थेला विश्रांती देण्यासाठी अन्न सेवन न करण्याची क्रिया ३७) तळहात ३९) मेंदूवर परिणाम होऊन विचित्र वागणारा, खुळा ४०) विष्णुपत्नी, लक्ष्मी ४१) सर्वोच्च, अत्युच्च ४२) कमळासारखे डोळे असलेला, पद्दलोचन, राजीवलोचन ४३) फार बारीक व मऊ, नाजूक किंवा पातळ ४४) एक जंगली प्राणी, रानरेडा ४६) सळई, गज ४७) भोजनातील एक घटक (भाजी वगैरे) ४८) काशाचे दुसरे नाव, बनारस ५०) भय, धास्ती, आशंका, धाक, डर ५१) मगर, सुसर, नक्र, बारा राशींपैकी दहावी रास ५२) ओझे, वजन ५३) बारीक बारीक मण्यांचा समुदाय, पेटविलेला काकडा ५४) पोळी, भाकरी ज्यावर भाजतात ते धातूचे गोलाकार पसरट पात्र ५६) तळलेला एक खमंग खाद्यपदार्थ ५७) अग्नी पेटविताना वारा घालण्याचे लोहाराचे साधन, बाण ठेवण्याची पिशवी ५८) सुंभ जळतो पण हा जळत नाही ५९) शंकर, महादेव, सांब.

------------------------पूर्ण-------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com