मराठी भाषातज्ज्ञ अरुण फडके यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 14 May 2020

मराठी शुद्धलेखन आणि भाषातज्ज्ञ अरुण फडके यांचे आज नाशिक येथे निधन झाले आहे. काही वर्षापासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि सून असा परिवार आहे. 

पुणे - मराठी शुद्धलेखन आणि भाषातज्ज्ञ अरुण फडके (वय 64) यांचे आज नाशिक येथे निधन झाले आहे. गेल्या काही वर्षापासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि सून असा परिवार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मराठी व्याकरण आणि शुद्ध लेखनतज्ज्ञ म्हणून ते सर्वांना परिचित होते. 'शुद्धलेखन ठेवा खिशात' या छोट्या पुस्तिकेपासून समग्र मराठी लेखन-कोशापर्यंत विविध प्रकारची पुस्तके त्यांनी लिहिली. 'शुद्धलेखन ठेवा खिशात' हे त्यांच्या पुस्तकावर आधारित असलेले अॅप त्यांनी तयार केले. पुस्तकलेखनाबरोबरच शुद्धलेखन कार्यशाळांच्या माध्यमातूनही ते मराठी भाषेच्या शुद्धतेविषयी लोकांना जागरूक करण्याचे कार्य करत होते. गेली काही वर्षे कर्करोगाशी लढा देत असतानाही त्यांचे कार्य सुरू होते. वडिलोपार्जित मुद्रण व्यवसायात असलेले फडके सर सुरुवातीला व्यवसायाची गरज म्हणून मुद्रितशोधन करू लागले. भाषेची आवड त्यांना असल्याने त्यांनी मराठी शुद्धलेखन या विषयाला वाहून घेतले होते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi-grammarist-arun-phadke-passes-away due to cancer in nashik