डेहणे येथील पंधरवड्यात मराठी भाषेशी निगडित स्पर्धा
चास, ता. १ ः डेहणे (ता. खेड) येथील हुतात्मा राजगुरू शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचा मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात आला. यामध्ये विविध विभागांचे प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या माध्यमातून डॉ. राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हा पंधरवडा साजरा झाला. यानिमित्त पंधरा दिवसांत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये काव्यवाचन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाला प्रमुख म्हणून कवी मोहम्मद शकील जाफरी हे उपस्थित होते. त्यांनी या प्रसंगी विद्यार्थ्यांनी कवितेच्या अंतरंगात जावे असे मनोगतात व्यक्त केले. या स्पर्धेत एकूण २५ विद्यार्थ्यांनी संकलित व स्वरचित कवितांचे वाचन केले. मराठी भाषेशी निगडित निबंध स्पर्धेमध्ये ५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. तसेच, मराठी स्वाक्षरी अभियानही यावेळी राबविण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर भागवत यांनी मराठीत स्वाक्षरी करून त्याचे उद्घाटन केले. या मोहिमेत सर्व विद्यार्थी व प्राध्यापकांनी मराठीत सह्या करून प्रतिसाद दिला.
प्राचार्य डॉ. भागवत, उपप्राचार्य प्रा. सिलदार पावरा, कनिष्ठ विभागप्रमुख प्रा. महेश रानवडे व इतर सहकारी प्राध्यापकांनी आयोजनात विशेष योगदान दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

