मंगळवेढा नगर वाचनालयात मराठी भाषा दिन साजरा
मंगळवेढा नगर वाचनालयात मराठी भाषा गौरव दिन
मंगळवेढा, ता. २७ः कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विविध शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये आणि सामाजिक संस्थांमध्ये मराठी भाषेच्या संवर्धनासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
नगरवाचनालयात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शहराध्यक्ष नागेश डोंगरे यांच्या हस्ते कार्यक्रम उद्घाटन करण्यात आले. यावेळी भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सुदर्शन यादव यांनी मराठी भाषेचा समृद्ध वारसा शेकडो वर्षांपासून कसा जपला गेला आहे. सध्या तो जपणे कस गरजेचं आहे यावर आपल्या भाषणातून मार्गदर्शन केले. या कार्यक्रमावेळी भाजप शहराध्यक्ष नागेश डोंगरे, उपाध्यक्ष संजय माळी, सरचिटणीस उमेश विभूते, नगरवाचनालय कार्यालय प्रमुख माऊली कुलकर्णी, चव्हाण साहेब उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

