esakal | VIDEO- मराठी दिनी अमोल कोल्हेंची शरद पवारांवर कविता, 'गडी एकटा निघाला'

बोलून बातमी शोधा

sharad pawar amol kolhe.}

डॉ. अमोल कोल्हे यांनी मात्र मराठीतील नामवंत साहित्यिक, कवींना सोबत घेत पहिल्या जागतिक मराठी परिषदेची मुहूर्तमेढ रोवणारे ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार यांच्यावर स्वत: रचलेली कविता सादर करुन मराठी भाषा दिनाच्या आगळ्या वेगळ्या शुभेच्छा दिल्या आहेत.

VIDEO- मराठी दिनी अमोल कोल्हेंची शरद पवारांवर कविता, 'गडी एकटा निघाला'
sakal_logo
By
शरद पाबळे

मराठी भाषा दिन सर्वत्र विविध उपक्रमांनी साजरा होत असताना, शिरुरचे खासदार आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी मात्र मराठीतील नामवंत साहित्यिक, कवींना सोबत घेत पहिल्या जागतिक मराठी परिषदेची मुहूर्तमेढ रोवणारे ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार यांच्यावर स्वत: रचलेली कविता सादर करुन मराठी भाषा दिनाच्या आगळ्या वेगळ्या शुभेच्छा दिल्या आहेत. या कवितेचा व्हिडिओ समाजमाध्यमावर दिवसभर व्हायरल झाला. या कवितेत त्यांनी ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार यांच्या झंझावातास प्रणाम करीत त्यांची आजवरची वाटचाल काव्यरुपाने शब्दबद्ध केली आहे. 
या कवितेत ते म्हणतात….. 

गडी एकटा निघाला

पुरोगामी महाराष्ट्रातूनी हुंकार एक उमटला, 
तुडवित रान उधळीत प्राण 
तो एकटा निघाला ॥

काट्यांनी रक्ताळलेले पाय जरी
अगणित धाव ते उरावरी, ओरखडा परी काळजावरी 
कधी न उमटू दिला 
तो एकटा निघाला ॥

बदनामीचे पचवून प्याले, विरोधाचे झेलून भाले
चित्त पेरुनी पावला जरी, ना थांबला ना संपला 
तो एकटा निघाला ॥

बळीराजाची येता साद,  कर्जमाफीचा क्षणी प्रतिसाद,  
स्वयंपूर्णता अन्नधान्यात, देशोन्नतीचा मार्ग रेखीला,
तो एकटा निघाला ॥

कला-क्रीडा साहित्यप्रेमी, विश्व प्रगतीचे भान नेहमी,
तळ हाताच्या रेषांपरी तया मी, हा महाराष्ट्र जाणला,
तो एकटा निघाला ॥
विज्ञानाची धरुनी कास, केला सत्य, शाश्वत विकास,
यशवंतरावांचा पट्टशिष्य हा सच्चा वारस शोभला.
तो एकटा निघाला ॥

अचुक आपत्ती व्यवस्थापन, मूर्त केले महिला धोरण,
दूरदृष्टीच्या निर्णयांचा,  तो धोरण कर्ता झाला,
तो एकटा निघाला ॥

उमर असे ती ऐंशीची, ५४ संसदीय जीवनाची,
राजकारणी देशाच्या ठसा मराठी उमटविला, 
तो एकटा निघाला ॥

शिवप्रभूंचा हाच वारसा,  फुले शाहू आंबेडकरी वसा,
जगता लढता जिवंतपणी तो, अभ्यासाचा ग्रंथच झाला,
तो एकटा निघाला ॥

तत्त्वांसाठी सदैव नडला, दडपशाहीला निर्भीड भिडला,
तरूणाईच्या मनावरही,  संघर्ष योद्धा म्हणुनी जडला,
तो एकटा निघाला ॥

जरी एकटा निघाला,  तरी गारूड जना मनाला,
जनसागर उसळत गेला, विकास गाण घुमवीत छान 
त्याने महाराष्ट्र घडविला ॥

तुडवित रान उधळीत प्राण, त्याने महाराष्ट्र घडविला,
त्याने महाराष्ट्र घडविला ॥