पिंपोडे बुद्रुक मराठी गौरव दिन

पिंपोडे बुद्रुक मराठी गौरव दिन

Published on

पिंपोडे बुदुकमध्ये
मराठी भाषा गौरवदिन

पिंपोडे बुद्रुक, ता. १ : येथील यशवंतराव चव्हाण विद्यालयात मराठी भाषा गौरव दिन विविध उपक्रमांनी उत्साहात झाला. या कार्यक्रमाची सुरुवात ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त कवी कुसुमाग्रज यांच्या व पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर गावातून ग्रंथदिंडी काढण्यात आली. या दिंडीत विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचा जागर केला. इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी मराठी भाषेवर आधारित प्रभावी पथनाट्य सादर केले, तर इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी ‘शाळा मराठी आमुची’ या गाण्यावर सुंदर नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यालयात विद्यार्थ्यांनी स्वरचित कविता, मराठी लेख तसेच मराठी भाषा गौरव दिनाविषयी प्रभावीपणे भाषणे सादर केली. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रम अधिक रंगतदार झाला. ग्रामस्थांनी ठिकठिकाणी दिंडीचे स्वागत केले. कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक एम. एस. साळुंखे, पर्यवेक्षक सी. बी. साळुंखे, व्ही. बी. जगताप, ए. आर. काशीद, बोबडे, पाडवी, शेटे, जाधव, आर. सी. केळगणे, ए. के. भोजने, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. मराठी विभाग प्रमुख जी. बी. पदमने यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com