करडे येथील विद्यालयात
‘कवी विद्यार्थ्यांच्या भेटीला’

करडे येथील विद्यालयात ‘कवी विद्यार्थ्यांच्या भेटीला’

Published on

न्हावरे, ता. ७ ः करडे (ता. शिरूर) येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या श्री भैरवनाथ विद्यालयात मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून काव्यवाणी या काव्य मंचाद्वारे आयोजित ‘कवी विद्यार्थ्यांच्या भेटीला’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मराठी भाषा विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी झालेल्या या कवी संमेलनामध्ये गझलकार, निवेदक, कवी दिनेश भोसले, काव्यवाणी काव्यमंचच्या अध्यक्षा वाणी ताकवणे तसेच विद्यालयाचे प्राचार्य कवी सत्यवान पवार यांनी कविता सादर केल्या.
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा व त्यांना सृजनात्मक लिखाणाची सवय लागावी या उद्देशाने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी विद्यालयातील २८ नवोदित बालकवींनी आपल्या कविता सादर केल्या. या बालकवी संमेलनात पावणी शरद लंघे या विद्यार्थिनीने ‘आपली माती’ या कवितेसाठी बालकवीचा पुरस्कार प्राप्त केला. तसेच, तिची काव्यवाणी बालकवी संमेलनासाठी निवड करण्यात आली. परीक्षक कवी दिनेश भोसले व कवयित्री वाणी ताकवणे यांनी तिच्या कवितेचे कौतुक केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव वाळके होते. तर, प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नवनाथ जाधव उपस्थित होते. या प्रसंगी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक अनिल गावडे, वर्षा सोनावळे, निलेश पवार, सुनील काळे, प्रमोद बाबर, संदीप ढोकणे, समिर गिरमकर, रुबीना मुलाणी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी भाषा विभागाचे प्रमुख ज्ञानेश्वर भोगावडे यांनी केले. वर्षा पवार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तर, पर्यवेक्षक सुरेश बिडवे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com