जिजामाता स्कूलमध्ये विविध उपक्रम

जिजामाता स्कूलमध्ये विविध उपक्रम

Published on

भोर, ता. २७ : येथील राजगड ज्ञानपीठाच्या जिजामाता इंग्लिश मीडियम स्कूल व ज्यूनियर कॉलेजमध्ये शुक्रवारी (ता. २८) मराठी भाषा दिन विविध व अनोख्या उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातील विविध किल्ल्यांच्या प्रतिकृती बनवून गडकिल्ल्यांच्या संवर्धनाचा संदेश दिला. मराठी कवींच्या कवितांचे चार्ट तयार करून कवी कुसुमाग्रज यांच्या कवितांचे सादरीकरण करून दाखवले. विविध वस्तूंचा वापर व वेशभूषा करून मराठी सणांचे महत्त्व पटवून दिले. मराठी महिने दिनदर्शिका व चार्ट तयार करून आणि त्याचे ऋतूनुसार असणारे महत्त्व सुद्धा सांगण्यात आले. मराठी साहित्यातील कथा, कादंबरी, पुस्तक या गोष्टी स्वतः विद्यार्थ्यांनी नाटकामध्ये पात्र म्हणून प्रदर्शित केल्या आणि त्यांचं महत्त्व व आजची दशा यावर सुंदर नाटक सादर केले. ज्यामध्ये ही पात्र एकमेकांशी संवाद करतानाचा जिवंत देखावा सादर करण्यात आला. मराठी संस्कृती प्रदर्शित करणारे विविध नृत्य प्रकार सादर करण्यात आले. मराठी भाषा गौरव म्हणून विविध मराठी ग्रंथाचे पूजन व वाचन करण्यात आले. मराठी भाषा वृद्धिंगत व्हावी म्हणून मराठी भाषेतील लेखन व वाचन या विषयांवर प्रात्यक्षिके करून दाखविण्यात आली.
मुख्याध्यापिका रुबिना सय्यद यांच्या मार्गदर्शनाखालील विद्यार्थी व शिक्षकांनी हे उपक्रम राबविले. या कार्यक्रमास विद्यार्थी व शिक्षकांसह पालक आणि शहरातील नागरिक उपस्थित होते. या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिल्पा बुदगुडे, कविता शिंदे, दीपाली खामकर आणि सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले.
राजगड ज्ञानपीठाचे संस्थापक अनंतराव थोपटे, अध्यक्ष माजी आमदार संग्राम थोपटे, सचिव स्वरूपा थोपटे, उपाध्यक्ष पृथ्वीराज थोपटे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे, पालकांचे, शिक्षकांचे कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com