वैद्य खडीवाले यांचे निधन 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 डिसेंबर 2017

पुणे : आयुर्वेदाचा वापर सर्वांकरता होऊ शकतो, हा विचार घेऊन आयुष्यभर झटणारे ज्येष्ठ आयुर्वेदतज्ज्ञ परशुराम यशवंत खडीवाले ऊर्फ वैद्य खडीवाले (वय 86) यांचे अल्पशा आजारामुळे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी परिवार असा परिवार आहे. 

पुणे : आयुर्वेदाचा वापर सर्वांकरता होऊ शकतो, हा विचार घेऊन आयुष्यभर झटणारे ज्येष्ठ आयुर्वेदतज्ज्ञ परशुराम यशवंत खडीवाले ऊर्फ वैद्य खडीवाले (वय 86) यांचे अल्पशा आजारामुळे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी परिवार असा परिवार आहे. 

खडीवाले हे भारतीय हवाई दलातून सुमारे सतरा वर्षे नोकरी करून एप्रिल 1968 मध्ये निवृत्त झाले होते. वडील यशवंत हरी वैद्य यांचा औषध निर्माणाचा मोठा व्यापार होता. त्याकडे पाहायला कोणी नव्हते. प.य. खडीवाले यांनी हवाई दलातून निवृत्त झाल्यावर पुण्यात येऊन सोळा हजार चौरस फुटांची जागा घेतली व हरी परशुराम औषधालय सुरू केले. त्यानंतर दुसऱ्या एका ठिकाणी आयुर्वेद औषधविक्री केंद्र सुरू केले. तेव्हापासून आतापर्यंत वैद्य खडीवाले आयुर्वेदातील औषधे निर्माण करण्याच्या क्षेत्रात काम करत होते. 

वैद्य खडीवाले यांनी आयुर्वेदासंदर्भात सामान्य नागरिकांचे वर्ग घेतले. आयुर्वेदाच्या 300हून अधिक औषधांचे महत्त्व त्यांनी समजावून सांगितले. त्याशिवाय, त्याबाबतच्या श्‍लोकांचे पाठांतरही ते करायला लावत. हे काम त्यांनी विनामोबदला अनेक वर्षांपासून केले.

त्यांनी भारतात धन्वंतरी याग कशाप्रकारे व्हावा, याचे तंत्र सांगून तो सुरू केला. आयुर्वेदिक उपचारांवर त्यांनी वेगवेगळ्‌या माध्यमातून सतत लेखन केले. वैद्य खडीवाले वैद्यक संशोधन संस्थेची स्थापनाही केली. त्यांचे 'आयुर्वेद सर्वांकरीता' हे पुस्तक गाजले. याशिवाय, 'आयुर्वेदीय उपचार', 'आयुर्वेदीय वनौषधी', 'ए टू झेड आरोग्यवर्धिनी', "औषधाविना उपचार', 'कानाचे विकार', 'निरामय सौंदर्य आणि आयुर्वेद', 'पूर्णब्रह्म', 'सहज सोपे घरगुती आयुर्वेदीय उपचार' अशी विविध पुस्तके प्रकाशित आहेत. 

त्यांच्या पार्थिवावर आजच संध्याकाळी पाच वाजता वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

Web Title: marathi news local news pune news vaidya khadiwale died