पुणे: ब्राह्मण महासंघाकडून महापालिकेच्या आवारात दादोजी कोंडदेवांची प्रतिमा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 मार्च 2018

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने आज इतिहास घडवला. गेली अनेक वर्षे सतत मागण्या, विनंती करूनही ना नगर पालिकेला जाग आली ना सरकारला. पण आपण आज काम केले सरकारचे, देवाचे आणि धर्माचे सुद्धा... ना कायदा हातात घेतला, ना नियम तोडले पण होय आपण, आपणच अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने आज माननीय दादोजी कोंडदेव यांच्या प्रतिमेचे पूजन केले.

पुणे : लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटविल्यानंतर महापालिकेकडून मिळालेले आश्वासन पूर्ण न झाल्याने अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाकडून महापालिकेच्या आवारातच दादोजी कोंडदेव यांच्या प्रतिमेचे पूजन केले.

पुणे महापालिकेत काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीची सत्ता असताना दादोजी कोंडदेव यांचा पुतळा लाल महालातून हटविण्यात आला होता. पुतळा हटवल्यानंतर ब्राम्हण महासंघाची अशी मागणी होती, की पुण्यात कोठे तरी दादोजी कोंडदेव यांचा पुतळा बसवावा. महापालिकेने तसे आश्वासन देखील दिले होते. म्हणून मनपा अधिकाऱ्यांना जाग आणण्यासाठी आज (बुधवार) त्यांच्या पुण्यतिथी दिनी मनपा आवारात कोंडदेवांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी निवेदनात म्हटले आहे, की अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने आज इतिहास घडवला. गेली अनेक वर्षे सतत मागण्या, विनंती करूनही ना नगर पालिकेला जाग आली ना सरकारला. पण आपण आज काम केले सरकारचे, देवाचे आणि धर्माचे सुद्धा... ना कायदा हातात घेतला, ना नियम तोडले पण होय आपण, आपणच अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने आज माननीय दादोजी कोंडदेव यांच्या प्रतिमेचे पूजन केले. त्यांच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना केली आणि ते ही पुणे महानगर पालिकेत जाऊन. कारण आपले हे शहर सुद्धा इतर राज्यांप्रमाणे पुतळे तोडणारे शहर म्हणून कुप्रसिद्ध न राहता येथे पुतळे परत लावणारे सुद्धा आहेत हे पण देशाला दाखवण्याचा हा प्रयत्न आहे. अभिमान आहे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी यांचा..धन्यवाद...मनापासून धन्यवाद!

Web Title: Marathi news Pune Dadoji Konddev municipal corporation Brahman mahasangh