पिंपरी-चिंचवडमध्ये वाहनांची तोडफोड

संदिप घिसे
सोमवार, 8 जानेवारी 2018

पिंपरीतील संत तुकाराम नगर परिसरात टोळक्याने येथील वाहनांची तोडफोड केल्याची घटना सोमवारी (ता.८) पहाटे उघडकिस आली.

पिंपरी : गेल्यावर्षी पिंपरी चिंचवड सुरू असलेले तोडफोडीचे सत्र यावर्षीही कायम आहे. पिंपरीतील संत तुकाराम नगर परिसरात टोळक्याने येथील वाहनांची तोडफोड केल्याची घटना सोमवारी (ता.८) पहाटे उघडकिस आली.

येथील राजमाता जिजाऊ सांस्कृतिक भवन आहे. या ठिकाणी दारू पिण्यासाठी बसणाऱ्या टोळक्याने ही तोडफोड केली. १५ दिवसापूर्वी याठिकाणी वाळलेल्या गवताला कोणीतरी आग लावली होती. परिसरात दहशतीचे वातावरण आहे.

Web Title: Marathi news Pune news attack on vehicles in Pimpri Chinchwad