भाजपचे ज्येष्ठ नेते ना. स. फरांदे यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 जानेवारी 2018

नाशिक पदवीधर मतदारसंघातून ते दोन वेळा विधानपरिषदेवर विजयी झाले होते. लोकसेभेचीही निवडणूक त्यांनी लढवली होती. भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यामध्ये त्यांची गणना होत असे.

पुणे : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते ना. स. फरांदे यांचे पुण्यात आज निधन झाले.

नाशिक पदवीधर मतदारसंघातून ते दोन वेळा विधानपरिषदेवर विजयी झाले होते. लोकसेभेचीही निवडणूक त्यांनी लढवली होती. भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यामध्ये त्यांची गणना होत असे. विधानपरिषदेचे सभापती व उपसभापतीपदही त्यांनी भूषवले होते. कोपरगाव मधील के जे. सोमय्या महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक असलेल्या फरांदे यांचा ज्ञानेश्‍वरी हा अभ्यासाचा विषय होता. 

फर्डे वक्ते म्हणून ते राज्यात प्रसिद्ध होते. भारतीय जनता पक्षाच्या सुरवातीच्या काळात तळागाळापर्यत पक्ष पोहचवण्यासाठी ज्या नेत्यांनी कष्ट घेतले त्यामध्ये त्यांचा समावेश होता. कोपरगाव शहर आणि तालुक्‍याचे अध्यक्ष झाल्यानंतर पुढे आमदार व त्यानंतर पक्षात व राज्यात त्यांच्याकडे अनेक मानाची पदे चालत आली. विधानपरिषदेचे उपसभापती आणि सभापती अशी मानाची पदे त्यांनी भूषवली. भारतीय जनता पक्षाचे पक्षाचे तो दोन वेळा प्रदेशाध्यक्षही होते. 

Web Title: Marathi news Pune news BJP leader NS Pharande