पुणे अंधशाळेचे कार्य दिपस्तंभाप्रमाणे - मोहन राठोड

संदीप जगदाळे
मंगळवार, 20 मार्च 2018

हडपसर - आयुष्यात कायमचा अंधार असताना, सुरेल आवाजात हिंदी व मराठी गीते गाणाऱ्या पुणे अंधशाळेतील विद्यार्थ्यांचा आर्केस्ट्रा पाहून मन प्रसन्न झाले. शालेय शिक्षणाबरोबरच विदयार्थ्यांच्या विविध कलागुणांना विकसित करण्यासाठी शाळा संधी देते. त्यामुळेच महाराष्ट्रात दृष्टिहिनांचे शिक्षण, प्रशिक्षण आणि पुनर्वसनाच्या क्षेत्रात पुणे अंधशाळेचे नाव प्राधान्याने घेतले जाते, असे मत विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंचालक मोहन राठोड यांनी व्यक्त केले. फुलसिंग राठोड यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजीत केलेल्या कार्यक्रमात राठोड बोलत होते. 

याप्रसंगी पुणे अंधशाळेचे प्रशासकिय अधिकारी कृष्णा शेवाळे, प्राचार्य़ चंद्रकांत भोसले, समुत्रा राठोड, संग्राम इंगळे उपस्थित होते.

राठोड पुढे म्हणाले, शाळेतील शिकलेले अनेक विदयार्थी समाजातील विविध क्षेत्रात नोकरी अथवा व्यवसायाच्या माध्यमातून समाजात आपल्या कार्याचा ठसा उमटवित आहेत. स्वावलंबी व स्वाभिमानी जीवन जगत आहेत. या मुलांना देवाने दृष्टि दिली नसली तरी उपल्बध शक्तीचा विकास करून शाळा या विदयार्थ्यांना घडविते. 1934 पासून सुरू असलेल्या या शाळेचे कार्य दिपस्तंभाप्रमाणे आहे. त्यामुळे अन्य संस्थांनी या शाळेचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्य करायला हवे. 

याप्रसंगी मुलांना खाउ वाटप करण्यात आले. तसेच विदयार्थ्यांनी सादर केलेल्या बहारदार वादयवृदांनी उपस्थितांची मने जिंकली. तसेच राठोड यांनी पुणे अंधशाळेसाठी देणगी जाहिर केली

Web Title: marathi news pune news mohan rathod pune andh shala