शिवनेरीसाठी शिवशाही बससेवा देण्यास महामंडळ अनुत्सुक 

दत्ता म्हसकर
शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018

जुन्नर (पुणे) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने माेठ्या दिमाखात सुरु केलेल्या शिवशाही बसची सेवा विशेष उपक्रम म्हणून शिवजयंतीच्या निमित्ताने शिवनेरी किल्ल्यासाठी देण्याच्या मागणीला महामंडळाने वाटाण्याचा अक्षता लावल्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. खासदार शिवाजीराव आढळराव तसेच सह्याद्री गिरीभ्रमण संस्थेने केलेल्या मागणीला पुणे विभाग नियंत्रकांनी केराची टाेपली दाखवली आहे. 

एस.टी. महामंडळाच्या विशेष उपक्रमाअंतर्गत शिवशाही बससेवा माेठ्या दिमाखात सुरु झाली. या बस सेवेचा शुभारंभ शिवनेरी किल्ल्यावरुन करावा अशी मागणी  सह्याद्री गिरीभ्रमण संस्था व खासदार आढळराव यांनी राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे केली हाेती. यासाठी संस्थेने पुढाकार घेत स्वतःहनु संपूर्ण बसचे आगाऊ आरक्षण करीत पहिली बस शिवनेरी ते सिंधुदुर्ग नेण्याचा प्रस्ताव महामंडळाला दिला हाेता. मात्र या मागणीची देखील परिवहन विभागाने दखल घेतली नाही. 

या बससेवेचा शुभारंभ झाल्यानंतर महामंडळाने विशेष उपक्रम म्हणुन येत्या शिवजयंतीसाठी १९ फेब्रुवारी आणि ४ मार्च राेजी शिवनेरी किल्ल्यासाठी सेवा देण्याची मागणी केली हाेती. मात्र महामंडळ स्वतःहुन अशी विशेष सेवा देऊ शकत नाही. आपण स्वतःहून संपूर्ण बसचे आरक्षण करण्याचा सल्ला पुणे विभाग नियंत्रकांनी संस्थेला दिला. 

दरम्यान किल्ले पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्यातील विविध किल्ले एस.टी. बस सेवेने एकमेकांना जाेडण्यात यावे अशी मागणी संस्था गेली अनेक वर्षांपासून करीत असून, या संकल्पनेवर संस्थेने स्वतः पुढाकार घेत २००८ साली शिवनेरी - रायगड बसचे आरक्षण करीत ही सेवा सुरु केली हाेती. 

शिवशाही नुसती बस मध्ये नकाे, तर कामातही हवी 
मंत्री येतात जातात, पण ठसा उमटवीणारा मंत्री हवा. बसेसच्या माध्यमातून नुसती शिवशाही नकाे ती कामातूनही दिसली पाहिजे. अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वपक्षीय मंत्री असलेल्या दिवाकर रावते यांना कानपिचक्या दिल्या हाेत्या. महामंडळाच्या वतीने मुंबईत नुकत्याच झालेल्या कर्मचाऱ्यांच्या नवीन गणवेश वितरण कार्यक्रमात या कानपिचक्या दिल्या हाेत्या. असे असून देखील चाकाेरी बाहेरचा विचार न करता शिवनेरी साठी शिवशाही बस नाकारणाऱ्या महामंडळा बाबत नाराजी व्यक्त हाेत आहे. 

Web Title: Marathi news pune news shivshahi bus shivneri fort