खेळाच्या प्रचारासाठी निष्फळ चर्चा टाळून प्रयत्न करणे गरजेचे - अंजली भागवत

Anjali-Bhagwat
Anjali-Bhagwat

नवी सांगवी (पुणे) : "शालेय वयातच खेळांचा प्रसार झाला पाहिजे अशी केवळ चर्चाच होते परंतु ही निष्फळ चर्चा टाळून खेळांचा दर्जा उंचावण्यासाठी सर्वच स्तरातून प्रयत्न करणे गरजेचे आहे." असे प्रतिपादन ऑलिंपिक पटु व राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार प्राप्त खेळाडु अंजली भागवत यांनी निगडी येथे केले.

पिंपरी चिंचवड शहर क्रीडा व शारीरिक शिक्षण संघटना यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण संघाचे संस्थापक अध्यक्ष शरदचंद्र धारूरकर यांना त्यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्याप्रसंगी भागवत यांनी आपले विचार मांडले. 

यावेळी व्यासपिठावर अर्जुन पुरस्कार प्राप्त खेळाडु शकुंतला खटावकर, शांताराम जाधव, पुणे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) डॉ. गणपतराव मोरे, राज चौधरी, शरद इनामदार, बाळकृष्ण आकोटकर, मनोज देवळेकर उपस्थित होते. ज्ञानप्रबोधिनी प्रशालेच्या सभागृहात पार पडलेल्या या सोहळ्यात संघटनेच्या वतीने गुणवंत क्रीडा शिक्षक संपदा कुलकर्णी, जगदीश सोनवणे, सचिन खांदवे, बन्सी आटवे व क्रीडा पत्रकार मिलिंद कांबळे यांच्यासह नव्वद राष्ट्रीय खेळाडुंना गौरविले. अविरत परिश्रम, सातत्य, जिद्द आणि सहनशिलता याचा संगम घालून यशाला गवसणी घालता येते याचा उल्लेख सर्वच श्रोत्यांनी आपल्या भाषणात व्यक्त केला. 

ऑलिंपिक पटु भागवत म्हणाल्या, "महाविद्यालयीन काळात राष्ट्रीय छात्र सेनेची मी विद्यार्थीनी असताना सर्व प्रथम मी बंदुक हाताळली. एनसीसीचे नियम आणि कडक शिस्तीच्या जोरावर मी पुढे गेले. युवा खेळाडुंनी आपले उद्दीष्ठ डोळ्यासमोर ठेऊन पुढे चालले पाहिजे. 

जिल्हा, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय या स्पर्धेच्या पायऱ्या ओलांडत खेळाडु घडत असतो. त्यामुळे शाळेतील क्रीडा शिक्षकाची भूमिका महत्वाची आहे. सचिन तेंडुलकर यांनीही मुलांना बालवयातच खेळाकरीता प्रोत्साहन मिळण्यासाठी संसदेत विचार मांडल्याचे अंजली भागवत यांनी आवर्जुन सांगतिले. त्यामुळे असे तपस्वी क्रीडाशिक्षक शरदचंद्र धारूरकर यांच्या सत्काराला बोलाविल्याबद्दल त्यांनी संयोजकांचे आभारही मानले. प्रास्ताविक शहराध्यक्ष चांगदेव पिंगळे यांनी केले, सचिव अंगद गरड यांनी आभार मानले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com